‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या देबंगना कलिता यांना जामीन

‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या देबंगना कलिता यांना जामीन

नवी दिल्ली : सीएएविरोधात दिल्लीतील दरयागंज येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पिंजरा तोड चळवळीतील कार्यकर्ता व जेएनयूतील संशोधक विद्या

शीला दीक्षित यांचे निधन
दिल्ली दंगलीतले अस्वस्थ करणारे प्रश्न
दिल्ली दंगलः दोन सत्यशोधक अहवालांची समीक्षा

नवी दिल्ली : सीएएविरोधात दिल्लीतील दरयागंज येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पिंजरा तोड चळवळीतील कार्यकर्ता व जेएनयूतील संशोधक विद्यार्थीनी देबंगना कलिता यांना पुरेसे पुरावे नसल्याने दिल्लीतील एका न्यायालयाने जामीन दिला आहे. महानगर दंडाधिकारी अभिनव पांडेय यांनी जामीन देताना दिल्ली पोलिसांकडून कलिता यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत एकही पुरावा सादर करता आलेला नाही असे स्पष्ट केले.

देबंगना कलिता यांनी दरयागंज येथे दंगल भडकवली याचे सीसीटीव्ही पुरावेही पोलिसांकडे नाहीत. पोलिसांनी हिंसाचारात जखमी झालेल्या एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार कलिता यांच्यावर दंगल भडकवल्याचे आरोप ठेवले आहेत, पण हे दावेच पुराव्याअभावी पुरेसे ठरत नसल्याने कलिता यांना जामीन नाकारता येत नाही. त्याचबरोबर दरियागंज दंगलीत कलिता यांचा सहभाग होता, असे कोणतेही पुरावे त्यांच्या लॅपटॉप व फोनमधूनही पोलिसांना सापडलेले नसल्याने त्यांचा दंगलीशी संबंध लावता येत नाही, असेही न्यायालयाने मत नोंदवले आहे.

कलिता यांनी कोणत्याही पोलिस चौकशीस तयारी दाखवल्याने त्यांना या कारणावरून जामीन देता येऊ शकतो असे न्यायालयाने सांगितले पण कलिता यांना निदर्शनात सहभागी होता येणार नाही, अशीही अट न्यायालयाने घातली. कलिता यांना ३० हजार रु.च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत कलिता यांचा पासपोर्टही न्यायालयात जमा करण्यात आला आहे.

पण कलिता यांच्या वकील तुशरिका मट्टू यांनी ‘द वायर’ला सांगितले की, कलिता यांना जामीन मिळाला असला तरी त्यांची अन्य प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू ठेवली असून त्यांना पोलिस कोठडीतच ठेवण्यात आले आहे.

जेएनयूतील दोन विद्यार्थीनी देबंगना कलिता व नताशा नरवाल यांना सीएएविरोधी आंदोलनात सामील झाल्या प्रकरणी व दरयागंज येथे दंगल भडकवल्याप्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत.

या दोघींना पूर्वी जामीन मिळाला असता दिल्ली पोलिसांनी लगेच त्यांच्यावर अन्य गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले. या दोघींना २८ मे रोजी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नरवाल यांच्यावर यूएपीएअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0