गुंड मोकाट, रक्तबंबाळ झालेल्या आयेशी घोषवर २ गुन्हे दाखल

गुंड मोकाट, रक्तबंबाळ झालेल्या आयेशी घोषवर २ गुन्हे दाखल

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये रविवारी गुंडांनी घातलेला हैदौस व विद्यार्थ्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे अनेक पुरावे जगजाहीर होऊनही मंगळवारी मात्र दिल्ल

चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती : दिल्ली पोलिस
हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध
जेएनयूत गुंडांचा ४ तास धुडगूस, विद्यार्थ्यांना जबर मारहाण

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये रविवारी गुंडांनी घातलेला हैदौस व विद्यार्थ्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे अनेक पुरावे जगजाहीर होऊनही मंगळवारी मात्र दिल्ली पोलिसांनी गुंडांच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष व अन्य १९ जणांवर २ गुन्हे दाखल केले आहेत. जेएनयूच्या प्रशासनाने विद्यापीठातील सर्व्हरची मोडतोड व सुरक्षा रक्षकांवर हल्ले केल्याने आयेशी व १९ विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद करावेत अशा दोन तक्रारी दिल्ली पोलिसांकडे केल्या होत्या. या दोन तक्रारींमध्ये केवळ ४ मिनिटांचे अंतर आहे. पण संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यामागे कोणताच पक्षपात नाही असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. आम्ही विद्यापीठ प्रशासनाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला. पण याच पोलिसांनी रविवारी विद्यापीठात हैदोस घातलेल्या एकाही गुंडाला अद्याप अटक केलेली नाही.

अखेर कुलगुरू प्रकटले

जेएनयूमध्ये बाहेरच्या गुंडांनी येऊन विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ले करूनही प्रसार माध्यमांपुढे येण्यास टाळाटाळ करणारे कुलगुरू जगदीश कुमार अखेर मंगळवारी प्रकट झाले. त्यांनी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती दाखवली व आता नव्याने सुरुवात करूया असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विद्यापीठाचा सर्व्हर सुरू झाला असून रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. जे विद्यार्थी हिंसाचारात जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील व त्यांचे दैनंदिन आयुष्य पुन्हा सुरू करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठात जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी होते. या विद्यापीठात मुद्द्यांवर चर्चा होते पण हिंसाचार होत नाही. हिंसेने कोणाचेही समाधान होत नाही. आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करूयात असे ते म्हणाले.

प्रख्यात अर्थतज्ज्ञ सीपी चंद्रशेखर यांचा राजीनामा

जेएनयूमध्ये गुंडांकडून झालेला हिंसाचार व देशाच्या सांख्यिकीय प्रणालीवर सरकारचा नसलेला विश्वास याचा निषेध करत जेएनयूमधील आपल्या प्राध्यापकपदाचा राजीनामा प्रख्यात अर्थतज्ज्ञ सीपी चंद्रशेखर यांनी मंगळवारी दिला. चंद्रशेखर हे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने तयार केलेल्या एका समितीवर नियुक्त केले गेले होते. पण जेएनयूत रविवारी झालेल्या हिंसाचाराने आपण अत्यंत व्यथित झालो असून सध्याच्या परिस्थितीत केंद्राने नेमलेल्या सांख्यिकी समितीची विश्वासार्हता पटत नाही. या समितीवर राजकीय दबाव आणला जात आहे व त्याने त्याची स्वायत्तता धोक्यात आली आहे. सरकारमधून चांगली सांख्यिकी व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असून अशा परिस्थिती आपण या समितीला आपले योगदान देऊ शकत नाही म्हणून राजीनामा देत असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0