निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला; मेधा पाटकर व अन्य ११ जणांवर फिर्याद

निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला; मेधा पाटकर व अन्य ११ जणांवर फिर्याद

नवी दिल्लीः आदिवासी मुलांच्या शिक्षणातील फंडचा दुरुपयोग केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर बरवानी जिल्हा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा आंदोलनाच

जेएनयूत गुंडांचा ४ तास धुडगूस, विद्यार्थ्यांना जबर मारहाण
चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती : दिल्ली पोलिस
जेएनयूतील सर्व्हरची तोडफोड मुलांनी केलीच नव्हती

नवी दिल्लीः आदिवासी मुलांच्या शिक्षणातील फंडचा दुरुपयोग केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर बरवानी जिल्हा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांवर फिर्याद दाखल केली आहे. मेधा पाटकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या ट्रस्टला गेल्या १४ वर्षांत १३.५० कोटी रु.चा निधी विविध माध्यमातून मिळाला. या ट्रस्टकडून नर्मदा खोऱ्यातील आदिवासी मुलांना शिक्षणाचा निधी पुरवण्यात येत होता, पण हा सर्व पैसा मेधा पाटकर व अन्य कार्यकर्त्यांनी राजकीय व देशविरोधी कारवायांसाठी खर्च केला, अशी तक्रार तेमला बुजूर्ग या गावातील नागरिक प्रीतमराज बदोले याने पोलिसांत दाखल केली होती. बदोले याने हा निधी कोणाकडून आला याची यादी पोलिसांना सादर केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मेधा पाटकर, परवीन रुमी जहांगीर, विजया चौहान, कैलाश अवसाया, मोहन पाटीदार, आशिष मंडलोय, केवल सिंग वसावे, संजय जोशी, श्याम पाटील, सुनीत एसआर, नूरजी पडवी व केशव वसावे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

हा खटला गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांतर्गत असून नर्मदा ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची माहिती व देणगीदारांची नावे तपासून पुढे कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान मेधा पाटकर यांनी आपल्या वरचे सर्व आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याची प्रतिक्रिया दिली. आमच्याविरोधात तक्रार करणारा भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता असून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटचा असल्याचे पाटकर म्हणाल्या.  गेले तीन दशके या जीवनशाळा सुरू आहेत, एक दशकभर येथील आदिवासींच्या पुनर्वसन कार्यात आमच्या संघटना कार्यरत आहेत, अशा आरोपांची अनेक वेळा कागदपत्रे देऊन उत्तरे दिली गेली आहेत. देशात राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोह असा वाद सुरू असून आमच्यावरील आरोपामागे राजकीय कारणेच असल्याचे पाटकर म्हणाल्या.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0