दिल्ली दंगलीत गोळ्या झाडणाऱ्या शाहरूखला अटक

दिल्ली दंगलीत गोळ्या झाडणाऱ्या शाहरूखला अटक

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीत जमावावर गोळीबार करणारा व दिल्ली पोलिसांतील वरिष्ठ हवालदार दीपक दाहिया यांच्यावर पिस्तुल रोखणाऱ्या २७ वर्षाच्या शाहरुखला मंग

दिल्ली हिंसाचाराबद्दल इतकं दीर्घ मौन का?
नॉर्थ ब्लॉकमध्ये बदल होणे हे हितावह
दिल्ली दंगल पूर्वनियोजित : दिल्ली हायकोर्ट

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीत जमावावर गोळीबार करणारा व दिल्ली पोलिसांतील वरिष्ठ हवालदार दीपक दाहिया यांच्यावर पिस्तुल रोखणाऱ्या २७ वर्षाच्या शाहरुखला मंगळवारी उ. प्रदेशातील शामली येथून अटक करण्यात आली. तो शामलीतील बस स्टँडवर उभा असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर दंगलीस जबाबदार व बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीतील सीलमपूर येथे राहणारा व व्यायामाची आवड असणाऱ्या शाहरुखवर यापूर्वी कोणत्याही गुन्ह्याची पोलिसांत नोंद नाही पण त्याचे वडील हे अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारे असून त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे व त्यासंदर्भात खटलेही चालू आहेत.

शाहरुखने जाफराबाद येथे दंगलीत जमावाच्या दिशेने गोळ्या झाडल्या तसेच दीपक दाहिया या पोलिसाला पिस्तुल दाखवून धमकावले होते. या घटनेचे छायाचित्र व व्हीडिओ सोशल मीडियात पसरल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या.

गेला आठवडा दिल्ली पोलिसांची टीम त्याचा शोध घेत होती. शाहरुख गोळ्या झाडल्यानंतर पंजाबमध्ये पळून गेला नंतर तो उ. प्रदेशात शामली येथे आला. दिल्ली पोलिस त्याच्या मागावर असल्याने त्याचा अखेरचा ठावठिकाणा लक्षात आल्यानंतर त्याला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. पण पोलिसांना त्याचे पिस्तुल अद्याप मिळालेले नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0