४ महिन्यात फेब्रुवारीत बेरोजगारीचा दर सर्वाधिक

४ महिन्यात फेब्रुवारीत बेरोजगारीचा दर सर्वाधिक

नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर ७.७८ टक्के तर जानेवारी तो ७.१६ टक्के असल्याची माहिती सीएमआयईने प्रसिद्ध

राफेल देखभालीच्या प्रचंड खर्चाचा हवाईदलावर बोजा
वर्षभरात कोविडने शिकविलेले धडे
महाराष्ट्र व बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली

नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर ७.७८ टक्के तर जानेवारी तो ७.१६ टक्के असल्याची माहिती सीएमआयईने प्रसिद्ध केली आहे. हा बेरोजगारीचा दर गेल्या ४ महिन्यातला सर्वाधिक होता. ऑक्टोबर २०१९नंतर हा दर सर्वाधिक असल्याचे सीएमआयई म्हणणे आहे.

गेल्याच आठवड्यात जीडीपी साडेचार टक्क्यांवर आला होता व तो गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक कमी होता.

सीएमआयईने ग्रामीण भारतातील बेरोजगारीचीही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या फेब्रुवारीत ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर ७.३७ टक्के तर जानेवारी महिन्यात ही टक्केवारी ५.९७ होती. तर शहरात जानेवारी महिन्यात टक्केवारी ९.७० होती पण फेब्रुवारीत घसरण होऊन ती ८.६५ टक्के इतकी झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0