फडणवीसांमुळे पक्ष सोडला : खडसे

फडणवीसांमुळे पक्ष सोडला : खडसे

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावात मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले.

न्या. एम. आर. शहांकडून मोदींचे कौतुक
काँग्रेसमध्ये बदल : गुलाम नबी, खर्गे यांना हटवले
अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ

खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पक्षातून बाहेर ढकलण्यात आल्याचे सांगितले. आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याच्या आरोप खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. अंजली दमानिया यांच्याद्वारे विनयभंगाचा खोटा आरोप लावण्यासाठी फडणवीस यांनी पोलिसांना फोन केला. तसेच भ्रष्टाचरचे आरोप उगाच करण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.

खडसे म्हणाले, “पण, मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. मी फक्त फडणवीसांवर खूप नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी करायला लावला. या सर्व मानसिक छळामुळेच मी पक्षांतराचा निर्णय घेतला.”

“गेले ४० वर्षे मी भाजपचे काम केले. पक्षाने मला मोठी पदे दिली. माझा भाजपवर रोष नाही. मी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वावर टीका केली नाही.”

“मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून, मी बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे असे म्हणालो, त्यानंतर जे झाले ते महाराष्ट्राने पाहिले आहे.”

“माझ्या अनेक चौकशा झाल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झाल्या. भूखंडाचे आरोप केले गेले. अलीकडच्या काळात माझ्यावर खोटा विनय भंगाचा आरोप आणि खटला दाखल झाला.”

“मी माझे उभे आयुष्य पक्षासाठी घालवले. टीका आणि दगड सहन केले. पकाशाने दिले त्यापेक्षा अधिक पक्षाला दिले.”

“माझी तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आहे. त्यांनी हे आरोप लावले आणि मनस्ताप दिला.”

“मी फडणवीस यांना विचारले, मी मुक्ताई नगरमध्ये त्या बाई मुंबईमध्ये असं कसा विनय भंगाचा गुन्हा दाखल होतो. तर ते म्हणाले, त्यांनी (अंजली दमानिया) खूप गोंधळ केल्याने आणि टीव्हीवर बातमी आल्याने, नाईलाजास्तव गुन्हा दाखल करायला सांगितला.”

“माझ्या कथित पीएवर ९ महीने पळत ठेवली जात असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले. म्हणजे मंत्र्यावर पाळत ठेवली जात होती.”

“अनेक आरोप असलेले नेते तुमच्याकडे आणि तुमच्याबरोबर आहेत. माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नव्हती, मग राजीनामा का घेतला?”

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी, २३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश निश्चित झाला असून आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करत आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले.  त्यानंतर खडसे यांनी पत्रकारपरिषद घेतली.

१९८४ ते १९८७ या काळात त्यांनी त्यांच्या कोथळी गावाचे सरपंचपद भूषवले होते. पुढे १९९० मध्ये मुक्ताई नगर मतदारसंघात विजय मिळवत त्यांनी पहिल्यांदा विधानसभा गाठली व २०१४पर्यंत सलग सहाव्यांदा ते येथून निवडून येत होते.

१९९५ साली युतीच्या सरकारमध्ये ते  उच्च तंत्रशिक्षणमंत्री, पाटबंधारे, अर्थ व नियोजन मंत्री होते. प्रतोद, उपनेता व २००९साली ते विरोधी पक्षनेते होते. २०१४ साली भाजप-शिवसेना युतीला विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी ते आग्रही होते. तेंव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये कुरघोडी सुरू झाली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0