उमर खलीदचा सरकारी पक्षावर वेळकाढूपणाचा आरोप

उमर खलीदचा सरकारी पक्षावर वेळकाढूपणाचा आरोप

 नवी दिल्ली: बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्याखाली अटक झालेला विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालीदने त्याचा जामीनअर्ज मागे घेऊन, नवीन जामीनअर्ज दाखल केला

संवेदनाशून्य तपास; दिल्ली पोलिसांना २५ हजाराचा दंड
दिल्ली दंगलः १७,५०० पानांचे आरोपपत्र दाखल
पोलिसांसमोर युवकाचा जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार

 नवी दिल्ली: बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्याखाली अटक झालेला विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालीदने त्याचा जामीनअर्ज मागे घेऊन, नवीन जामीनअर्ज दाखल केला आहे. दिल्लीत फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलीचे कारस्थान रचण्यात उमर खलीदचा सहभाग होता असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

खलीदने दाखल केलेला जामीनअर्ज टिकण्याजोगा नाही असा आक्षेप दिल्ली पोलिसांनी घेतल्यामुळे नवीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) ४३९व्या कलमाखाली जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतल्यामुळे ४३७व्या कलमाखाली नवीन अर्ज दाखल केल्याचे खलीदचे वकील त्रिदीप पैस यांनी सत्र न्यायाधिशांना सांगितले.

४३९वे कलम उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालयाला जामिनासंदर्भात देण्यात आलेल्या विशेषाधिकांशी संबंधित आहे. तर ४३७वे कलम अजामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात दिल्या जाणाऱ्या जामिनासंदर्भात आहे.

काँग्रेसच्या माजी नगरसेवक इशरत जहाँ यांच्या जामीनअर्जावरही ऑगस्टमध्ये दिल्ली पोलिसांनी हाच आक्षेप घेतला होता. जहाँ यांनाही दिल्ली दंगलींसंदर्भात यूएपीएखाली अटक करण्यात आली आहे.

पैस यांनी युक्तिवाद करू देण्याची विनंती न्यायालयाला केल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीत म्हटले आहे. सरकारी पक्ष वेळकाढू तंत्रे वापरत असल्याच्या खलीदच्या आरोपावरही विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी आक्षेप घेतला. मात्र, जामीनअर्जात सीआरपीसीच्या तरतुदीखेरीद अन्य कोणताही बदल केलेला नाही, असे आश्वासन पैस यांनी न्यायालयाला दिले.

न्यायाधिशांनी नवीन जामीनअर्जाचे उत्तर देण्यास पोलिसांना सांगितले व ८ सप्टेंबर ही तारीख पुढील सुनावणीसाठी दिली.

आरोपपत्रामध्ये कोणतेही तथ्यात्मक पुरावे न देता अतिशयोक्तीपूर्ण आरोप करण्यात आले आहेत, असे खलीदने ३ सप्टेंबर रोजी न्यायालयापुढे सांगितले होते. एखाद्या हेरगिरीविषयक चित्रपटात शोभतील असे आरोप ठेवून आपल्याला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत, असे तो म्हणाला होता.

खलीदच्या जामीनअर्जात काहीच दम नाही, असा दावा दिल्ली पोलिसांनी यापूर्वी केला होता.

मूळ बातमी:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0