आसाममध्ये जमावाकडून डॉक्टरची हत्या, २१ अटकेत

आसाममध्ये जमावाकडून डॉक्टरची हत्या, २१ अटकेत

गुवाहाटी : जोरहाट जिल्ह्यातील तिओक गार्डन भागात ७३ वर्षीय डॉ. देबेने दत्ता यांची जमावाने शनिवारी हत्या केली. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या एका मजुराचा उ

आसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
मेवानी यांचा जामीन मंजूर
नागालँडमध्ये १३ नागरिक सुरक्षा दलाकडून ठार

गुवाहाटी : जोरहाट जिल्ह्यातील तिओक गार्डन भागात ७३ वर्षीय डॉ. देबेने दत्ता यांची जमावाने शनिवारी हत्या केली. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने डॉ. देबेन दत्ता यांना आपले लक्ष्य केले. जमावाच्या हा झुंडशाहीचा ७४ सेकंदाचा डॉक्टरांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

डॉ. दत्ता हे मेडिकल ऑफिसर म्हणून तिओक चहा गार्डनमधील एका रुग्णालयात काम करत होते. शनिवारी दुपारी ३२ वर्षीय शुक्र मांझी या चहा मजूराला अपघात झाल्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते पण उशीर झाला होता. त्यांचा मृत्यू तिओक गार्डन रुग्णालयात झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर मांझी यांचे नातेवाईक व सहकारी यांनी संतप्त होऊन रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केली. सुमारे २० जणांचा जमाव रुग्णालयात घुसला आणि त्यांनी रुग्णालयावर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. डॉ. दत्ता यांनी जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले पण जमावाची संख्या वाढत केली व त्यांनी डॉ. दत्ता यांना आपले लक्ष्य केले. डॉ. दत्ता यांच्या डोक्यात तुटकी खिडकी घालण्यात आली. जमाव इतका हाताबाहेर गेला होता की रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. दत्ता यांना उपचार मिळू नये म्हणून जमावाने त्यांच्या शरीराभोवती कडे केले होते. रुग्णवाहिकेलाही त्यांनी येऊ दिले नाही. अखेर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिस व जिल्हाधिकारी घटनास्थळी आल्यानंतर डॉ. दत्ता यांना जोरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले पण त्यांचा रुग्णालयात पोहचण्याआधी मृत्यू झाला.

रविवारी डॉ. दत्ता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती जोरहट जिल्हा पोलिस प्रमुख वैभव निंबाळकर यांनी द वायरला दिली. या घटनेची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले असून सात दिवसांत अहवाल तयार करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या आहेत. डॉ. दत्ता यांच्या हत्येचा निषेध म्हणून रविवारी २४ तासांचा बंद डॉक्टरांनी पाळला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: