पराभव मानण्यास ट्रम्प यांचा नकार

पराभव मानण्यास ट्रम्प यांचा नकार

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांना धोबीपछाड

प्रेरक डेस्मंड टूटू
संसदीय समितीमार्फत फेसबुकची चौकशी व्हावीः काँग्रेस
सबका विश्वास?!

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांना धोबीपछाड दिलेला असला तरी ट्रम्प प्रशासन सत्ता सोडण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र दिसत असल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. गेल्या दोन दिवसांत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या लष्करातील प्रमुख पदांच्या नेमणुकीत, नियुक्तींमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली. मंगळवारी ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेची संरक्षण कचेरी पेंटॅगॉनमधील तीन वरिष्ठ अधिकार्यांची हकालपट्टी केली. तर दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी संरक्षणमंत्री मार्क इस्पर यांना राजीनामा द्यायला लावला होता.

ट्रम्प येत्या काही दिवसांत सीआयएचे संचालक जिना हास्पेल, एफबीआयचे संचालक क्रिस्तोफर रे यांचाही राजीनामा घेतील अशी चर्चा आहे.

मंगळवारी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पपिओ यांनी ट्रम्प यांचा अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला नसल्याचाही दावा केला. ट्रम्प सरकार दुसर्या कारकिर्दीकडे सहजपणे जात असल्याचे विधान त्यांनी केले. जगाचे आपल्याकडे लक्ष आहे. अनेक नेते मला दूरध्वनी करत असतात. मतमोजणी अद्याप सुरू आहे. आम्ही सर्व मते मोजणार आहोत. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियेचे पालन केले जाणार असून राज्यघटनेचे आम्ही पालन करत आहोत, असेही ते म्हणाले. पॉम्पपिओ यांनी म्यानमारमधील होणार्या निवडणुकांवर भाष्य केले.

ट्रम्प आडमुठेच

जगभरातले नेते बायडन यांच्या निवडणुकीचे स्वागत करत असताना ट्रम्प यांनी मात्र आपला पराभव अद्याप मान्य केलेला नाही. गेल्या दोन दिवसांत बायडन यांच्या निवडीबद्दल फ्रान्स, आयर्लंड, ब्रिटन व जर्मनीच्या प्रमुखांनी बायडन यांना दूरध्वनी केला व त्यांच्याशी चर्चा केली. तर तुर्कीचे अध्यक्ष तय्यीप एर्दोगन यांनीही बायडन यांच्या निवडीबाबत त्यांचे अभिनंदन करणारा संदेश पाठवला. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद सलमान जे ट्रम्प यांचे निकटचे समजले जात होते, त्यांनी बायडन यांना अभिनंदनपर संदेश पाठवला आहे.

बायडेन यांनी या सर्व नेत्यांना अमेरिका पूर्वपदावर येत असल्याचे उत्तर पाठवले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0