आर्थिक विकासदर १२ टक्क्याने वाढेलःआयएमएफ

आर्थिक विकासदर १२ टक्क्याने वाढेलःआयएमएफ

२०२१ या आर्थिक वर्षांत भारताचा आर्थिक विकासदर १२.५ टक्क्याने तर २०२२ मध्ये तो ६.९ टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने वर्तवला

पाचोळा : सामान्य माणसाची शोकात्मिका
‘क्रोनोलॉजी समझीये’ : सीबीआयच्या माजी प्रमुखांवरही पाळत
म्हाडाची २३ ऑगस्टला ८ हजार २०५ सदनिकांसाठी सोडत

२०२१ या आर्थिक वर्षांत भारताचा आर्थिक विकासदर १२.५ टक्क्याने तर २०२२ मध्ये तो ६.९ टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने वर्तवला आहे. हा विकासदर चीनपेक्षा अधिक असेल असेही नाणेनिधीचे म्हणणे आहे.

कोरोना महासाथीमुळे जगात केवळ चीनचा आर्थिक विकासदर सकारात्मक म्हणजे २.६ टक्के इतका होता तर अन्य देशांचा आर्थिक विकासदर ऋणात्मक झाला होता. २०२१मध्ये चीनचा आर्थिक विकासदर ८.६ टक्के तर २०२२ मध्ये तो घसरून ५.६ टक्के इतका असेल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. २०२०मध्ये चीनचा आर्थिक विकासदर २.६ टक्के इतका होता.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी जगाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा वेग येईल, असा आशावाद व्यक्त केला. २०२१मध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ६ टक्के तर २०२२मध्ये ४.४ टक्के इतका असेल असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी २०२०मध्ये जगाच्या आर्थिक विकासदरात ३.३ टक्क्यांनी घसरण झाली होती. आता जगातल्या अनेक देशांमधून जी माहिती मिळत आहेत, सरकारी उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, त्यावरून आपणाला अजून अनेक संकटांना सामोरे जावे लागणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0