कर्ज नव्हे, पैसे द्या – राहुल गांधी

कर्ज नव्हे, पैसे द्या – राहुल गांधी

मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रु.च्या आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा अशी विनंती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी एका पत्रक

लघुउद्योगांपुढील आव्हाने आणि उपाययोजना
मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना
करोना आणि कृत्रिम बुद्धिमता

मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रु.च्या आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा अशी विनंती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केली. स्थलांतरित श्रमिक व देशातील गोरगरीबांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची ही वेळ असून त्यांना पैशाची गरज कर्जाची नाही, असेही ते म्हणाले.

जे पॅकेज हवे आहे ते कर्जाचे नको आहे. मोदी सरकारने माझी पूर्ण निराशा केली आहे. शेतकरी, मजूर व गरीबांच्या खात्यात पैसे जमा करण्याची गरज आहे. आपण (सरकार) कर्ज द्यावे, पण भारत माताने आपल्या मुलांशी सावकारासारखं वागणं योग्य नाही, त्यांच्या खिशात थेट पैसे जमा करण्याची गरज आहे. या वेळेस गरीब, शेतकरी, मजूरांना कर्जाची नव्हे तर पैशांची गरज आहे. माझी मोदी सरकारला विनंती आहे की त्यांनी या आर्थिक पॅकेजबाबत पुन्हा विचार करावा आणि शेतकरी, गोरगरीब, मजूरांना थेट पैसे द्यावेत, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या न्याय योजनेबाबत राहुल गांधी म्हणाले, या योजनेचा विचार दीर्घकालिन होता. पण आम्ही कोरोनाचे संकट पाहून ५० टक्के गरजूंच्या हाती पैसा जावा असा सल्ला मोदी सरकारला दिला होता. सरकार लोकांच्या हातात पैसे देत नाही, त्याचे एक कारण मी असे ऐकले होते की त्याने वित्तीय तूट वाढून बाहेरच्या पतनिर्धारण कंपन्या देशाचे रेटिंग कमी देतील पण आपल्या देशाचे रेटिंग मजूर, शेतकरी, छोटे उद्योजक तयार करतात. त्यामुळे या रेटिंगची काळजी करू नये, त्यांना पैसे द्यावेत, असे राहुल गांधी म्हणाले.

आर्थिक आघाडीवर मोठे वादळ येत असून त्यातून अनेकांचे मोठे नुकसान होणार आहे. अजून मोठे वादळ आलेले नाही, ते येत आहे. जर मागणीच कमी झाली तर त्याने नुकसान मोठे होईल. लोकल व्होकल केव्हा होईल, जेव्हा गरीबांच्या पोटात अन्न जाईल. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. कोरोनानंतर आपण संधी शोधू शकतो पण आता कोरोनाशी लढायचे आहे.

केरळ मॉडेलचे कौतुक

राहुल गांधी यांना कोरोनाविरोधात यश मिळवलेल्या कोरोना मॉडेलचे कौतुक केले. या राज्याचे मॉडेल अन्य राज्यांनी स्वीकारले पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे. या घडीला सरकारने लॉकडाऊन विचारपूर्वक व सावधपणे मागे घेतले पाहिजे. ज्येष्ठ व गंभीर आजारी असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

रस्त्यावर चालत असलेल्या लाखो स्थलांतरित श्रमिकांबद्दल राहुल गांधी म्हणाले, या श्रमिकांना मदत करणे गरजेचे आहे. भाजपचे सरकार केंद्रात आहे, व त्यांचे कडे सर्व उपाय आहेत. आपण कुणावर आरोप करत नाही आहोत, सगळ्यांनी मिळून या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे. ही विरोधकांची जबाबदारी आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0