नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी ईडीने अटक केली. सकाळी
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी ईडीने अटक केली.
सकाळी सव्वा आठच्या सुमारास ईडीचे काही अधिकारी तिहारमध्ये सीबीआय कोठडीत असलेल्या पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी आले. आणि सुमारे दोन तास चाललेल्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
चिदंबरम येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत. त्यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी नव्याने अर्ज केला आहे. आपल्याला केवळ अपमानित करण्यासाठी सीबीआय तुरुंगात ठेवू इच्छित आहे असा आरोप त्यांनी आपल्या अर्जात केला होता. आपल्या विरोधात कोणताही आरोप नाही व कोणत्याही साक्षीदारावर आपण व आपल्या कुटुंबाने दबाव आणलेला नाही असेही त्यांनी सांगितले होते.
COMMENTS