‘संघा’वर बंदी घालण्याची अकाल तख्तची मागणी

‘संघा’वर बंदी घालण्याची अकाल तख्तची मागणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न हे देशहिताच्या विरोधात असल्याने या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी अकाल तख्तचे हंग

कर्नाटकात राजकीय अनिश्चितता
५ राज्यांतल्या निवडणुकांत भाजपचा एकूण खर्च ३४४ कोटी
प्रजासत्ताक ते फॅसिझम

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न हे देशहिताच्या विरोधात असल्याने या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी अकाल तख्तचे हंगामी अध्यक्ष ग्यानी हरप्रीत सिंग यांनी केली आहे. ग्यानी हरप्रीत सिंग हे अकाल तख्तचे हंगामी जथ्येदार (प्रमुख) असून एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान सोमवारी केले होते. त्यानंतर मंगळवारीही त्यांनी संघाची अखंड हिंदू राष्ट्राची भूमिका देशाचे विभाजन करणारी आहे असा आरोप केला.

विजया दशमीच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राचा पुन्हा मुद्दा मांडल्यानंतर त्याला प्रतिक्रिया म्हणून ग्यानी हरप्रीत सिंग यांनी हे विधान केले आहे. भागवत यांच्या या विधानाचा दोन दिवसांपूर्वीच शिरोमणी प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल यांनी निषेध केले होता. भागवत यांची भूमिकाच वादग्रस्त असून भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देत आहे असे ते म्हणाले होते.

संघ व अकाल तख्त यांच्यामध्ये अनेक काळापासून मतभेद आहेत. संघाच्या हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत शीख धर्मालाही सामावून घेत हा धर्म हिंदू धर्माचाच एक भाग असल्याची मांडणी संघाची असल्याने त्याला अकाल तख्ताचा विरोध आहे. संघाच्या व्यापक हिंदू धर्म मांडणीत शीख धर्माव्यतिरिक्त जैन, बौद्ध धर्माचाही समावेश आहे.

मध्यंतरी संघाने शीखांचे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यालाही अकाल तख्ताचा विरोध होता. शीख धर्म हा स्वतंत्र धर्म असून त्याचे इतिहासातील महत्त्व व तिची ओळख वैशिष्ट्यपूर्ण आहे, या धर्माच्या स्वत:च्या परंपरा, श्रद्धा व रुढी असल्याने त्यामध्ये संघाने ढवळाढवळ करू नये अशी भूमिका मागे ग्यानी गुरबचन सिंग यांनी अकाल तख्तचे अध्यक्ष असताना घेतलेली होती.

जम्मू व काश्मीरचा विशेष दर्जा असलेले ३७० कलम काढून घेतल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी काश्मीरी मुलींशी आता लग्न करता येऊ शकते अशी वादग्रस्त विधाने केली होती. या विधानांवरही ग्यानी हरप्रीत सिंग यांनी आक्षेप घेतला होता. काश्मीर महिला आपल्या समाजाच्या एक भाग आहेत. त्यांचे संरक्षण व गौरव करणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1