एल्गार परिषदः १५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

एल्गार परिषदः १५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबईः २०१८च्या एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील १५ आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात मसूदा आरोपपत्र दाखल केले

पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला – शरद पवार
भीमा-कोरेगाव, जज लोया आणि भिडे-सनातन
भीमा-कोरेगाव तपास एनआयएकडे

मुंबईः २०१८च्या एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील १५ आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात मसूदा आरोपपत्र दाखल केले आहे. या १५ आरोपींवर यूएपीए व भारतीय दंडसंहितेअंतर्गत १७ वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहेत.

या मसूदा आरोपपत्राविषयी विशेष न्यायालय येत्या २३ ऑगस्टला विचार करून आरोपींवरचे आरोप निश्चित करणार आहे. कोणताही खटला सुरू होण्याआधी आरोप निश्चित करणे ही पहिली पायरी असते. यात आरोपींविरोधातले आरोप व पुराव्यांची माहिती द्यावी लागते. जेव्हा आरोप निश्चित होतात तेव्हा न्यायालय आरोपींना त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा करते.

इंडियन एक्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १५ आरोपींवरील १७ आरोपांमध्ये दहशतवादी कृत्ये, बेकायदा कारवाया, कट रचणे, बंदी घातलेल्या संघटनांशी असलेले संबंध, अवैध मार्गाने निधी जमवून त्याचा उपयोग देशाच्या विरोधात करणे, देशाविरोधात युद्ध पुकारणे, देशाच्या विरोधात युद्ध व्हावे म्हणून चिथावणी देणे, देशद्रोह व शत्रूत्व वाढावे म्हणून प्रचार करणे अशा प्रकारचे आरोप आहेत.

या आरोपपत्राची प्रत मात्र अद्याप एकाही आरोपीला देण्यात आलेली नाही.

सोमवारी आरोपींच्या वकिलांनी ज्या आरोपींविरोधात आरोप दाखल केले आहेत, त्या आरोपींनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जांची सुनावणी व्हावी व त्यांचा निपटारा करावा अशी न्यायालयाला विनंती केली.

प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे, कार्यकर्ता गौतम नवलखा, दिल्ली विश्वविद्यालयातील प्राध्यापक हनी बाबू, कबीर कला मंचचे सदस्य सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, कार्यकर्ते सुधीर ढवळे, महेश राउत, प्रा. शोमा सेन, कवी वरवरा राव, सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वर्नन गोन्सालवीस यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फादर स्वामी यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: