थरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले

थरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले

चार वर्षांपूर्वीच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत बाद झालेल्या इंग्लंडच्या संघाने रविवारी लॉर्डसवर अत्यंत थरारक अशा अंतिम सामन्यात न्यू

दांभिकतेचा कळस!
नेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा
महेंद्रसिंग धोनीः कल्पक कप्तान, ‘ग्रेट फिनिशर’

चार वर्षांपूर्वीच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत बाद झालेल्या इंग्लंडच्या संघाने रविवारी लॉर्डसवर अत्यंत थरारक अशा अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभव केला. क्रिकेटला जन्म देणाऱ्या या देशाच्या नावावर आजपर्यंत विश्वविजेतेपदाची नोंद नव्हती. पण गेल्या चार वर्षात या देशाने संघाच्या बांधणीवर प्रयत्न केले व अत्यंत दर्जेदार खे‌ळाचे प्रदर्शन दाखवत पहिल्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. न्यूझीलंडला विश्वविजेतेपदाने दिलेली ही दुसरी हुलकावणी होती. पण या संघाच्या या स्पर्धेतील कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली.

इऑन मॉर्गन, इंग्लंडचा कप्तान

इऑन मॉर्गन, इंग्लंडचा कप्तान

न्यूझीलंडने इंग्लंडसमोर २४२ धावांचे आव्हान दिले होते. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला रोखत त्यांचा डाव २४१ धावांवर संपुष्टात आणला. हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरचा पर्याय वापरण्यात आला. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. तर न्यूझीलंडनेही १५ धावा केल्या. पण आयसीसीच्या नियमांनुसार इंग्लंडने न्यूझीलंडच्या (१६)तुलनेत सर्वाधिक चौकार व षटकार (२४) मारले असल्याने त्यांच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली.

क्रिकेटच्या आजपर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा असा सामना बरोबरीत झाला नव्हता. ही एक आगळीवेगळी घटना या निमित्ताने नोंदली गेली.

इंग्लंडला शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. बेन स्टोक्सने एक षटकार खेचला व दुसऱ्या चेंडूला ओव्हर थ्रो गेल्याने त्यांना चार अतिरिक्त धावा मिळाल्या. अखेरच्या चेंडूत दोन धावांची गरज होती पण मार्क वूड दुसरी धाव काढताना रनआऊट झाला व सामना बरोबरीचा झाला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये स्टोक्स पुन्हा मैदानावर बटलर बरोबर आला. इंग्लंडने षटकात १५ धावा केल्या. न्यूझीलंडच्या नॅशमने जॉफ्रा आर्चरच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. नंतर शेवटच्या चेंडूला दोन धावांची गरज होती. पण या चेंडूवर धाव घेताना गुप्तील धावचीत झाला पण न्यूझीलंडची धावसंख्या १५ झाली व याही षटकात बरोबरीच झाली. अखेर सर्वाधिक चौकार मारल्याने इंग्लंडला विजयी घोषित केले.

केन विल्यम्सन, न्यूझीलंडचा कप्तान

केन विल्यम्सन, न्यूझीलंडचा कप्तान

इंग्लंड व न्यूझीलंड या दोन्ही संघाची कामगिरी अखेरपर्यंत सर्वोत्कृष्ट राहिली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षणाने प्रेक्षकांची मने जिंकली. न्यूझीलंडच्या काही व्यूहरचना तर अनपेक्षित होत्या. त्यामुळे इंग्लंडला ते शेवटपर्यंत रोखण्यात यशस्वी झाले.

इंग्लंडच्या बटलर व स्टोक्सने सामना रंगतदार अवस्थेत आणला होता. बटलर ५९ धावांवर बाद झाला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ३१ चेंडूत ४६ धावांची गरज होती. नंतर स्टोक्सने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ८४ धावा केल्या. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

छायाचित्रे – सौजन्य ‘द गार्डियन’

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0