‘भारताची राज्यघटना व संघराज्य मान्य नाही’

‘भारताची राज्यघटना व संघराज्य मान्य नाही’

नवी दिल्लीः नागा लोक कधीही भारतीय संघराज्याचे भाग नव्हते व ते कधीही भारतीय राज्यघटना स्वीकारणार नाहीत, अशी मोदी सरकारला अडचणीत टाकणारी भूमिका नॅशनल सो

परदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण
मुंबई : मरणाच्या दारात उभे असलेले शहर
धगधगता व अस्वस्थ हाँगकाँग

नवी दिल्लीः नागा लोक कधीही भारतीय संघराज्याचे भाग नव्हते व ते कधीही भारतीय राज्यघटना स्वीकारणार नाहीत, अशी मोदी सरकारला अडचणीत टाकणारी भूमिका नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम (इसाक मुईवा )ने घेतली आहे.

एनएससीएन(आय-एम)चे सरचिटणीस थुईनगालेंग मुईवा (८६) यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना सुमारे ५५ मिनिटांची एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी आपल्या स्वतंत्र नागा देशाची भूमिका स्पष्ट करत नागांचा झेंडा व नागांची राज्यघटना यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही ठामपणे सांगितले.

आमच्या स्वतंत्र झेंडा व राज्यघटनेच्या भूमिकेच्या विरोधात नागालँडमधील काही राजकीय पक्ष वा सिविल सोसायटी असतील तर त्या गद्दार आहेत, असाही आरोप थुईनगालेंग मुईवा यांनी केला. मुईवा यांनी भारत व नागालँडचे राज्यपाल यांच्यातील संवादक असलेले आर. एन. रवी यांच्यावरही टीका केली. रवी यांनी एनएससीएनला धोका दिला. त्यांनी आम्हाला फेकून दिले. ते केंद्रीय गृहखात्याच्या इशार्यावर चालत होते, असा आरोप मुईवा यांनी केला. भारत सरकारने आमच्या मागण्यांवर सहमती दाखवली नाही त्यामुळे आम्हाला चर्चा सोडून द्यावी लागली असे ते म्हणाले.

भारतासोबतच्या चर्चा फिस्कटल्या तर नागालँडमध्ये पुन्हा बंडखोर गट आपली शस्त्रे हाती घेतील का, असे विचारले असताना मुईवा यांनी या प्रश्नावर थेट उत्तर न देता हा प्रश्न सरकारला आपण विचारायला हवा, असे उत्तर दिले.

मुईवा यांच्या एकूण मुलाखतीवरून लक्षात येते की नागांसाठी त्यांची अस्मिता व इतिहास हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून हा प्रदेश कधीच भारताच्या अधिपात्याखाली नव्हता, असा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.

१५ ऑक्टोबरला नागालँडमधील सर्व राजकीय गट व सिविल सोसायट्यांनी एकमताने ठराव पास करून भारत सरकारसोबत चाललेल्या चर्चेला पाठिंबा दिला. पण या ठरावात नागालँडला स्वतःचा स्वतंत्र झेंडा असावा या एनएससीएन (आय-एम) गटाच्या मागणीबाबत मौन बाळगण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0