आयसीआयसीआय-व्हीडिओकॉन घोटाळाः दीपक कोचर यांना अटक

आयसीआयसीआय-व्हीडिओकॉन घोटाळाः दीपक कोचर यांना अटक

मुंबईः आयसीआयसीआय बँक व व्हीडिओकॉन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आयसीआयसीआय बँकच्या माजी प्रमुख चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी स्थानिक न्याय

पिगॅसस हेरगिरी : अॅपलकडून एनएसओवर खटला
‘आंदोलनाचा अधिकार आहे पण रस्ते अडवू नका’
समस्यांकडे दुर्लक्ष करीत वाढदिवस साजरा

मुंबईः आयसीआयसीआय बँक व व्हीडिओकॉन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आयसीआयसीआय बँकच्या माजी प्रमुख चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने ताब्यात घेतले आहे. दीपक कोचर १९ सप्टेंबरपर्यंत ईडीच्या ताब्यात राहणार आहेत. कोचर यांनी मोठ्या प्रमाणावर पैशाची हेराफेरी केल्याचे गुन्हे त्यांच्यावर ईडीने लावले असून त्याअंतर्गत त्यांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दीपक कोचर यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे ईडीकडे जमा झाले होते. पण त्यांना अटक होऊ शकली नव्हती. कोरोनाच्या या महासाथीत त्यांनी दिल्लीस ईडीच्या कार्यालयात जाण्यास नकार दिला होता. कोचर यांनी आपल्याशी सहकार्यही केले नसल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे  त्यांना मुंबईतल्या ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

२०१७मध्ये व्हीडिओकॉनची कोट्यवधी रु.ची थकबाकी व दीपक कोचर यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याचे निःष्पन्न झाल्यानंतर सीबीआयने चौकशी सुरू केली होती.

मार्च २०१८मध्ये आयसीआयसीआयच्या कार्यकारी संचालक व सीईओ चंदा कोचर यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर चंदा कोचर यांना बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

आयसीआयसीआय बँकेने व्हीडिओकॉन समुहाला ३,२५० कोटी रु.चे कर्ज दिले होते. त्या बदल्यात व्हीडिओकॉनचे संचालक वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांना व्यावसायिक मदत केली होती. व्हीडिओकॉनने आपले २,८१० कोटी रु.चे कर्ज चुकवले नव्हते. त्यामुळे या कंपनीचे बँक खाते बुडीत खाते म्हणून आयसीआयसीआयने जाहीर केले होते.

डिसेंबर २००८मध्ये वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर व चंदा कोचर यांचे काही नातेवाईक यांच्या मदतीने एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला आयसीआयसीआय बँकेने ६४ कोटी रु.चे कर्ज दिले. त्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी आपले स्वामित्व हक्क दीपक कोचर यांच्या एका ट्रस्टला केवळ ९ लाख रु.च्या मोबदल्यात विकले.

त्यानंतर व्हीडिओकॉनने त्यांना मिळालेल्या कर्जातील काही रक्कम दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवली होती.

जानेवारी २०१९मध्ये सीबीआयने दीपक कोचर, वेणुगोपाल धूत व चंदा कोचर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेने चंदा कोचर यांची सीईओ पदावरून हकालपट्टी केली.

सध्या आयसीआयसीआय बँकेने १,८७५ कोटी रु.चे कर्ज दिल्याच्या प्रकरणाचा ईडी तपास करत आहे.

गेल्या जूनमध्ये ईडीने चंदा कोचर, दीपक कोचर व त्यांच्या ताब्यात असलेल्या कंपन्यांची सुमारे ७८ कोटी रु.ची संपत्ती जप्त केली आहे. यात तामिळनाडू व महाराष्ट्रातील त्यांची घरे, जमीन, दागदागिने, काही छोटे कारखाने व यंत्रे यांचा समावेश आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0