कोणत्याही पक्षाचा संबंध नाहीःशेतकऱ्यांचे मोदींना पत्र

कोणत्याही पक्षाचा संबंध नाहीःशेतकऱ्यांचे मोदींना पत्र

नवी दिल्लीः ३ शेती कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष नाही वा पक्षांचा आंदोलनाशी संबंध नाही, असे पत्र अखिल भारती

पंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील?
‘दिल्लीत बसून शेतकऱ्यांच्या समस्या कळत नाहीत’
‘बाजार समित्या, हमी भाव बंद होणार नाही’

नवी दिल्लीः ३ शेती कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष नाही वा पक्षांचा आंदोलनाशी संबंध नाही, असे पत्र अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना शनिवारी पाठवले. या शेतकरी आंदोलनाच्या मागे विरोधी पक्ष आहेत, हा सरकारचा आरोपही या संघटनांनी फेटाळला आहे. या समितीमध्ये ४० शेतकरी संघटना असून त्यांचे कार्यकर्ते गेले २४ दिवस दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत.

या पत्रात आंदोलक म्हणतातः शेती कायद्यांविरोधातल्या आमच्या आंदोलनामुळे उलट सर्वच राजकीय पक्षांना जाग आली आहे. आमच्या कोणत्याही राजकीय मागण्या नाहीत. तुम्ही (मोदी) या कायद्यांवर विविध स्तरावर चर्चा झाल्याचा दावा केला आहे पण आपल्याला स्पष्ट केले पाहिजे की शेती हा राज्याचा विषय असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा विषयही राज्यांचा असतो. यावर काही राज्यांनी बदल केले आहेत. पण केंद्रीय स्तरावर आपण कायदा करून आमच्यावर तो थोपवला गेला आहे. हा झटका आपण ५ जून रोजी देशाला दिला होता. आपण कोणत्याही शेतकरी संघटनांशी चर्चा केली नव्हती. संसदेतही विरोध न ऐकता हे विधेयक संमत केले गेले. आमच्या आंदोलनाला बदनाम करण्यासासाठी हे आंदोलन विरोधी राजकीय पक्षांचे, काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, हुड्डा कमिटी, अकाली दल, मतांसाठी, पूज्य बापूंचा अवमान, दंगलीतील आरोपींची सुटका, ६२चे युद्ध, भारतीय उत्पादनांचा बहिष्कार, असे अनेक आरोप केले होते. या आरोपांचा व आंदोलनाचा काही संबंध नाही. हे मुद्दे आमच्या आंदोलनात मुळीच नाही व त्या आमच्या काहीही मागण्या नाहीत. सरकारने कायद्यातील मुद्द्यांवर आमच्याशी चर्चा करावी व विषय सोडवावा..

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: