शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिमेंट बॅरिकेड, काटेरी कुंपण, खंदक

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिमेंट बॅरिकेड, काटेरी कुंपण, खंदक

दिल्लीच्या वेशीवर सिंघु सीमेवर ठाण मांडून बसलेल्या हजारो शेतकर्यांनी राजधानी नवी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांकडून सीमेव

मंडई कर गरजेचाः अर्थ खात्याचे मत
शेतकरी आंदोलनात खलिस्तानी : केंद्र
शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला

दिल्लीच्या वेशीवर सिंघु सीमेवर ठाण मांडून बसलेल्या हजारो शेतकर्यांनी राजधानी नवी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांकडून सीमेवर मोठ्या प्रमाणात सिमेंट बॅरिकेड्स बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी खंदक खणण्यात आले आहेत. तर शेतकर्यांनी वाहनांसहीत राजधानीत प्रवेश करू नये म्हणून वाहनांची टायर पंक्चर करण्यासाठी अणकुचीदार खिळे जमिनीत सिमेंटमध्ये पक्के बसवण्यात आले आहेत. काही ठिकाणी काटेरी कुंपणांचे चार पाच टप्पे करण्यात आले आहेत.

अशी कुंपणे नवी दिल्ली-हरयाणा सीमेवरही लावण्यात आली आहेत.

२६ जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर दिल्ली पोलिस व केंद्र सरकारने शेतकर्यांविरोधात आपली रणनीती बदलल्याची ही चिन्हे आहेत.

याबाबत दिल्लीचे पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांना अशा तयारीविषयी विचारले असता त्यांनी २६ जानेवारीची घटना झाल्यानंतर हे प्रश्न का विचारले गेले नाहीत असा प्रतिप्रश्न केला. पोलिसांकडून सुरक्षिततेसाठी हे सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. २६ जानेवारीला पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचे प्रयत्न झाले, अनेक बॅरिकेड्स तोडले गेले, त्यावर कोणी प्रश्न उपस्थित केले नाहीत. आता आम्ही केवळ सीमेवर पक्के बॅरिकेड लावत असून ते आंदोलकांना मोडता येऊ नये म्हणून बसवले जात असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

आंदोलकांचा निर्धार कायम

दरम्यान, सिंघु सीमेवर काटेरी कुंपणे व पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला असतानाही हजारो शेतकर्यांनी आपले आंदोलन कायमच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे. सोमवारी शेकडो शेतकर्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आणि सीमेवर अशी कुंपणे बसवून आमचा निग्रह कमी होणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

२८ वर्षांचे मोहाली येथील जशानदीप नोकरी सोडून आपली पत्नी व एक वर्षाच्या मुलीसहित सिंघु सीमेवर आले आहेत. त्यांनी आपल्या मागण्यांपासून एक इंचही मागे जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. अशी कुंपणे बांधून आम्ही गप्प बसू असे सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असल्याचे ते म्हणाले. पोलिसांचा फौजफाटा आणून जर आमच्यावर दबाव आणण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर तो त्यांचा गैरसमज असून आम्ही मुळात योद्धे आहोत व आमची लढाई सर्वांच्या हितासाठी आहे, देशाच्या भविष्यासाठी आहे. सरकार सिमेंटच्या भिंती बांधेल पण आमचा निर्धार ते मोडू शकत नाही, असे जशनदीप सिंग म्हणाले.

दिल्लीच्या सर्व सीमांवर निमलष्करी दलाचे जवानही काही प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. यात रॅपिड अक्शन फोर्स, सीआरपीएफचे जवान आहेत. पण पोलिसांची संख्या अधिक प्रमाणात दिसत आहे.

ट्रेनचा मार्ग बदलला

सोमवारी पंजाबमधील फिरोजपूर येथून सुटणार्या अमृतसर मेलचा मार्ग बदलल्याने शेतकर्यांमध्ये रोष निर्माण झाला. पंजाब मेल दिल्लीला पोहचणार होती पण तिचा रोहटक ते रेवारी हा मार्ग बदलून ती मुंबईला रवाना झाली. या मेलमध्ये दिल्लीत आंदोलनासाठी शेतकरी जात होते. दरम्यान रेल्वेने मेलचा मार्ग बदलण्यामागे तांत्रिक कारण होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राजस्थानातून जुन्या दिल्लीत पंजाब व हरयाणा मार्ग जाणारी रेल्वे बहादूरगड येथे रोखण्यात आली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0