‘एमएसएमई’, ‘एनबीएफसी’ला मदत

‘एमएसएमई’, ‘एनबीएफसी’ला मदत

कोरोना महासाथीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, मध्यम उ

कोरोनावरच्या औषधाचा दावाच नव्हताः पतंजली
मॉडर्नाची कोरोना लस ९४.५ टक्के गुणकारी
पीएम केअर्स : लपवाछपवी व टोलवाटोलवी

कोरोना महासाथीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, मध्यम उद्योजकां(एमएसएमई)ना विना तारण सुमारे ३ लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर गैर बँकिंग (एनबीएफसी) वित्तीय कंपन्यांसाठी विशेष लिक्विडिटी स्कीम सुरू करणे, कर्मचार्यांचा तीन महिन्याचा ईपीएफची रक्कम कमी करणे, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पुढे ढकलणे, अशा सवलती जाहीर केल्या.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रु. आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार या पॅकेजमधील निधी कोणकोणत्या क्षेत्राला देण्यात येणार आहे, या संदर्भातील विवरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी करणार होत्या. त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषदेत सवलती जाहीर केल्या. पण या उपाययोजना व सवलतींमुळे अर्थव्यवस्थेला किती सुधारणा होऊ शकतात आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला किती झळ बसली आहे, या संदर्भात त्यांनी काही माहिती दिली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0