मुंबई पोलिसांकडून अजब तपासणी

मुंबई पोलिसांकडून अजब तपासणी

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणात सुमारे दोन वर्षे तळोजा कारागृहात असलेले सामाजिक कार्यकर्ते वर्नन गोन्सालविस यांची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे

अल-काइदाचा प्रमुख अल-जवाहिरी ठार
क्वारंटाइन
शिक्षण धोरणः बहुविधलैंगिकतेच्या नजरेतून

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणात सुमारे दोन वर्षे तळोजा कारागृहात असलेले सामाजिक कार्यकर्ते वर्नन गोन्सालविस यांची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे दोन पोलिस नुकतेच त्यांच्या अंधेरी येथील घरात पोहोचले. या पोलिसांनी गोन्सालविस यांच्या पत्नी सुसान अब्राहम व मुलगा सागर यांना वर्नन गोन्सालविस कुठे आहेत असे प्रश्न विचारले.

दरम्यान झालेल्या या घटनेबाबत पेशाने वकील असलेल्या सुसान अब्राहम यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग व मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्त यांना एक सविस्तर पत्र लिहून झालेली संपूर्ण घटना विशद केली.

आपल्या पत्रात अब्राहम यांनी कोरोना संसर्गाची साथ मुंबई पोलिसांमध्ये पसरली असताना दोन पोलिस त्यांच्या अंधेरी येथील घरात कसे आले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. जेव्हा पोलिस आमच्या हौसिंग सोसायटीमध्ये आले तेव्हा मी व माझा मुलगा सागर घरी होतो आणि कोणतीही कल्पना न देता पोलिस आमच्या सोसायटीत आल्यामुळे आम्हाला धक्का बसला. पोलिस आल्याने आधीच कोरोनामुळे तणावात असलेल्या आमच्या हौसिंग सोसायटीमध्ये तणावाचे वातावरण पसरले. गेले अनेक वर्षे मी वकिली करत आहेत व पोलिसांना त्याची माहिती आहे. त्याच्याकडे माझा फोन नंबरही असेल. जर चौकशी करायची असेल तर त्या अगोदर मला फोन करता आला असता तो केला गेला नाही, याकडे सुसान गोन्सालविस यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.

पोलिसांनी हौसिंग सोसायटीच्या गेटवर आल्यानंतर आम्हाला बोलावून घेतले. माझा मुलगा सागर गेटवर गेला व त्याने कसली चौकशी आहे, असे विचारले. त्यानंतर पोलिसांनी ही आमची नेहमीची तपासणी असल्याचे कारण सांगत सुमारे तासभर सागर यांच्याकडून वर्नन गोन्सालविस यांच्याबद्दलची सर्व माहिती पुन्हा घेतली. त्यांच्यावर कुठले गुन्हे कोणत्या कारणाखाली, दाखल झाले आहेत, ते कोणत्या तुरुंगात आहेत, याची माहिती घेतली.

मूळ प्रकरण

ऑगस्ट २०१८मध्ये गोन्सालविस व अन्य १० सामाजिक कार्यकर्त्यांना एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली. गोन्सालविस यांनी नंतर एनआयएनने ताब्यात घेतले. गोन्सालविस यांच्यावर पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले. यात भीमा कोरेगाव प्रकरणापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गोन्सालविस सीपीआय (माओ) या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य असल्याचाही पोलिसांचा आरोप आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0