अदानी आशियातील श्रीमंताच्या यादीत दुसरे

अदानी आशियातील श्रीमंताच्या यादीत दुसरे

नवी दिल्लीः देशातील अब्जाधीश गौतम अदानी व त्यांच्या कुटुंबाची संपत्ती गेल्या काही वर्षांत १.४० लाख कोटी रु.हून ५.०५ लाख कोटी रु.इतकी चौपटीने वाढल्याचे दिसून आले आहे. संपत्तीतील या वाढीमुळे अदानी हे आशियातील श्रीमंतांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी चीनमधील झाँग शानशान यांना मागे टाकले आहे. गौतम अदानी यांचे बंधु विनोद शांतीलाल अदानी यांच्याही संपत्तीत तिपटीने वाढ होऊन ती १.३१ लाख कोटी रु. इतकी झाली आहे.

पहिला क्रमांक रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा कायम आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती ७ लाख १८ हजार कोटी रु. इतकी आहे. हुरून इंडियाने श्रीमंताची यादी केली आहे त्यात ही माहिती मिळाली आहे. मुकेश अंबानी यांनी गेली १० वर्ष आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत म्हणून स्थान अबाधित ठेवले आहे, असे हुरुन इंडियाचे म्हणणे आहे.

अदानी समुहाची भांडवली बाजारातील संपत्ती ९ लाख कोटी रु. इतकी झाली आहे. या संपत्तीत अदानी पॉवर कंपनीचा समावेश नाही. अदानी समुहातील प्रत्येक कंपनी ही १ लाख कोटी रु.ची आहे.

गौतम अदानी हे भारतातील एकमेव उद्योजक आहेत की त्यांच्या एक नव्हे तर ५ कंपन्यां १ लाख कोटी रु.च्या असल्याचे हुरुन इंडियाचे मुख्य अनास रेहमान जुनैद यांनी सांगितले.

कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणार्या सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस पुनावाला यांच्याही संपत्तीत गेल्या वर्षभरात ७४ टक्क्याने वाढ होऊन ती १.६३ लाख कोटी रु. इतकी झाली आहे.

हुरुन इंडियाच्या यादीतील अन्य नावे पुढील प्रमाणे, एचसीएलचे शिव नादर, हिंदुजा ग्रुपचे एस. पी. हिंदुजा, अर्सेलरमित्तलचे लक्ष्मी मित्तल, अव्हेन्यू सुपरमार्केटचे राधाकृष्णन दमानिया, आदित्य बिर्ला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला व झेडस्केलरचे जय चौधरी.

मूळ बातमी

COMMENTS