गोव्यात ऑक्सिजन अभावी ४८ तासांत ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

गोव्यात ऑक्सिजन अभावी ४८ तासांत ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

पणजीः गेल्या ४८ तासांत गोव्यात ४७ रुग्ण ऑक्सिजनची टंचाई, वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मरण पावले आहे. हे सर्व मृत्यू गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहेत. हे

ओमायक्रॉनचे आव्हान चिंता वाढवणारेः मुख्यमंत्री
भारताचा जीडीपी १.६ टक्के : गोल्डमॅन सॅशचा अंदाज
कोरोना : जनता मृत्यू आणि दारिद्र्याच्या कडेलोटावर

पणजीः गेल्या ४८ तासांत गोव्यात ४७ रुग्ण ऑक्सिजनची टंचाई, वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मरण पावले आहे. हे सर्व मृत्यू गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहेत. हे सर्व मृत्यू  सत्तारुढ भाजप सरकारचा निष्काळजीपणा-बेजबाबदारपणा असून या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांमधील मोठ्या प्रमाणावरील मतभेद दिसून आले आहेत.

११ मे रोजी २६ कोरोना रुग्ण ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने मरण पावले होते. त्यानंतर बुधवारी २१ कोरोना रुग्णांवर हीच वेळ आली असे सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी द वायरला सांगितले.

द वायरकडे सरकारी मेडिकल कॉलेज व सरकार यांच्यादरम्यान काही कागदपत्रे आहे. त्या नुसार १० मे रोजी झालेल्या पत्रव्यवहारात १२०० ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता असताना रुग्णालयाकडे केवळ ४०० सिलेंडर असल्याची माहिती आहे. आपल्याला लवकरात लवकर ऑक्सिजन सिलेंडर मिळावेत अशी मागणी करणारे अनेक दूरध्वनी रुग्णालय प्रशासनाने सीएम कार्यालयाकडे केले. मंगळवारी दुपारी २ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान ऑक्सिजन सिलेंडर कमी पडू लागले तसे धावपळ सुरू झाली पण त्यावर सिलेंडर वेळेत मिळाले नाहीत.

गोव्यात आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण ३,१२४ इतके सापडले असून ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मंगळवारचा आहे.

प्रमोद सावंत व विश्वजीत राणेंमधील संघर्ष चव्हाट्यावर

ऑक्सिजनची वाढती मागणी व सरकारचा त्या संदर्भातील बेजबाबदारपणा यावरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. राणे फ्रंटलाइनवरील आरोग्य व्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रीत करत असताना २१ एप्रिलला अचानक सावंत यांनी सरकारी रुग्णालयात कोविड-१९ व्यवस्थापन स्थापन पाहण्यासाठी तीन सदस्यांची एक नोडल समिती स्थापन केली. या समितीकडे बेड, औषधे, ऑक्सिजन पुरवठा व हेल्पलाइनवर देखरेख ठेवण्याचे काम सोपवण्यात आले. हे अधिकारी आयएएस दर्जाचे असून यातील एकाही अधिकार्याला प्रत्यक्ष जमिनीवर आरोग्य यंत्रणा हाताळण्याचा अनुभव नाही.

गोव्यातील कोविड परिस्थिती चिंताजनक होऊ लागली, लोकांचे फोन हेल्पलाइनवर मोठ्या संख्येने येऊ लागले, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून चर्चा सुरू होऊ लागली, निवासी डॉक्टरांनी रुग्णालयांमधील ऑक्सिजनची परिस्थिती मांडण्यास सुरूवात केली, सोशल मीडियावर गोव्यातील परिस्थिती मांडली जाऊ लागली त्या संदर्भात स्वेतिका संचन या अधिकार्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आपण स्वतःच तीन दिवस विलगीकरणात असून बाहेरची परिस्थिती माहिती नाही. आपली मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असून तिचे आयुष्य माझ्यासाठी या घडीला महत्त्वाचे असल्याचे उत्तर ऐकायला मिळाले.

संचन याना राज्यातील ऑक्सिजनच्या टंचाईबाबत विचारले असता त्यांनी ही परिस्थिती खरोखरीच अभूतपूर्व संकटाची असून आपण ज्युनियर पदाचे अधिकारी असून या संदर्भातील माहिती आपले वरिष्ठ कुणाल झा देतील असे सांगितले.

कुणाल झा यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी होऊ शकला नाही. द वायरने आरोग्य सचिव रवी धवन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तोही होऊ शकला नाही.

गोव्यातल्या ढासळत्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी गौरेश कलंगुटकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री गेले दोन आठवडे राज्यातील कोविड परिस्थिती पाहात आहेत.

त्यांचा हा दावा मंगळवारी दिसून आला. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, या देशातला मी पहिलाच असा मुख्यमंत्री आहे की ज्याने कोविड-१९ वॉर्डला भेट दिली आहे. आमच्याकडे १०० टक्के ऑक्सिजन आहे. रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळत नाही ही प्रमुख समस्या असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या वेळी मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांना परिस्थिती पूर्वपदाला येईल, सर्व समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.

बुधवारी २१ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला एक दिवस होत असताना बुधवारी आणखी २१ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. या मृत्यूसंदर्भात खुद्ध आरोग्य मंत्र्यांनी सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी होणार्या या मृत्यूंची उच्च न्यायालयातर्फे चौकशी व्हावी अशी मागणी केली. मुंबई उच्च न्यायालय सध्या गोवा सरकारच्या गैरव्यवस्थापनासंदर्भात अनेक याचिकांचा विचार करत आहे. पण राणेंच्या अशा मागणीमुळे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. मुख्यमंत्री व त्यांच्या निकटवर्तीयांनी आरोग्य खात्यात हस्तक्षेप केल्यामुळे राणे अस्वस्थ झालेले दिसतात.

वाद कोणतेही असोत पण केवळ सावंतच नव्हे तर राणेंनाही या परिस्थितीला जबाबदार धरायला हवे अशी मागणी गोव्यातील एका प्रतिष्ठित फिजिशियनने केली. व्यवस्थापन एवढ्या खालच्या थराला कोसळले आहे ते कोसळू देणे, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा दाखवणे हाच मोठा गुन्हा असून एवढ्या मृत्यूंसाठी कोणाला जबाबदार धरायचे असा सवाल या फिजिशियनचा आहे.

देविका सिक्वेरा या गोवास्थित मुक्त पत्रकार आहेत

वृत्त छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे.

 मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0