महिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे

महिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे

बंगळुरुः भारतीय हवाई दलातील एका महिला प्रशिक्षणार्थी उमेदवाराच्या आत्महत्येप्रकरणात हवाई दलातील सहा अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या

बिहारः एनडीए-महागठबंधनमध्ये चुरस
भारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक
कलम ३७० चे मिथक आणि राजकारण!

बंगळुरुः भारतीय हवाई दलातील एका महिला प्रशिक्षणार्थी उमेदवाराच्या आत्महत्येप्रकरणात हवाई दलातील सहा अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात अंकिता झा (२७) या महिला प्रशिक्षणार्थीने गळफास लावून आत्महत्या केली होती. अंकिता एअर फोर्स टेक्निकल कॉलेजची विद्यार्थीनी होती. अंकिताचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसांत केली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली व  हवाई दलातील सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंकिताच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघडकीस आलेले नाही, तिने स्वतःला फाशी घेतली होती असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. पोलिसांनी सहा संशयितांना अद्याप अटकही केलेली नाही. अंकिताचे शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिस तपासाला अधिक वेग घेईल असे सांगण्यात आले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0