अशोक स्तंभाच्या नव्या प्रतिकृतीत बदल; सरकारवर संताप

अशोक स्तंभाच्या नव्या प्रतिकृतीत बदल; सरकारवर संताप

नवी दिल्लीः नव्या संसद भवनाच्या वर लावण्यात येणाऱ्या व राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी

शेती कायद्याला विरोध; पोलिस उपमहानिरीक्षकांचा राजीनामा
अमेरिकेला भारताचे अजब उत्तर
व्हीआर चौधरी हवाई दलाचे नवे प्रमुख

नवी दिल्लीः नव्या संसद भवनाच्या वर लावण्यात येणाऱ्या व राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या अशोक स्तंभाचा अनावरण कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमाला विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याला, लोकप्रतिनिधींना सरकारकडून निमंत्रण धाडण्यात आले नव्हते. त्यात नव्या अशोक स्तंभातील सिंह हा मूळ अशोक स्तंभापेक्षा वेगळा असल्याने अनेकांनी नाराजी व संताप व्यक्त केला.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय प्रतीकाच्या अनावरणाचा कार्यक्रम कार्यकारी प्रमुख म्हणून का केला नाही असा प्रश्न उपस्थित करण्यापासून त्यांनी मूळ प्रतिकाच्या रचनेतही बदल करून अवमान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

या आरोपावरून सोशल मीडियात वादळ उठल्यानंतर नव्या अशोक स्तंभाचे रचनाकारांनी राष्ट्रीय प्रतिकामध्ये कोणताही बदल केला नाही असा दावा केला आहे. पण नव्या अशोक स्तंभाचे जे फोटो प्रसिद्ध झाले आहेत व प्रत्यक्ष अशोक स्तंभ कलाकृतीमध्ये बदल झाल्याचे लक्षात येते.

राष्ट्रीय जनता दलाने एक ट्विट करत मूळ अशोक स्तंभातील सिंहाचे भाव सौम्य पण रुबाबदार आहेत, हा नवा सिंह अत्यंत आक्रमक प्रवृतीचा वाटत असून नजरेत हिंस्त्रपणा दिसत असल्याची टीका केली आहे. प्रत्येक प्रतीक हे माणसाच्या अंतरात्म्याचा आविष्कार असते, प्रतिकांच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवृती दिसण्याची अपेक्षा असते. हा नवा सिंह सर्वकाही खाऊन टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असल्याची टीका राजदने केली आहे.

राजदपाठोपाठ तृणमूल काँग्रेसनेही अशोक चिन्हाचा सरकारने अवमान केल्याचा आरोप केला आहे. अशोक स्तंभातील सिंह हे रुबाबदार, डौलदार, राजसी वाटतात पण मोदींच्या सिंहाची प्रतिकृती अनावश्यक आक्रमक, ओबडधोबड व लाज वाटणारी असून ती त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी तृणमूलचे नेते जवाहर सिरकार यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0