अमरनाथ यात्रा: गेल्या वर्षी पूर आला, त्या ठिकाणीच यंदा यात्रेकरूंचे तंबू

अमरनाथ यात्रा: गेल्या वर्षी पूर आला, त्या ठिकाणीच यंदा यात्रेकरूंचे तंबू

एका वृत्तानुसार, अमरनाथमध्ये ८ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे ज्या ठिकाणी १६ लोकांचा मृत्यू झाला होता, ती जागा कोरडी नदी आहे आणि गेल्या वर्षीही याच ठिकाणी पूर आला होता. ही माहिती असतानाही अधिकाऱ्यांनी भाविकांसाठी त्याच ठिकाणी मंडप उभारून लंगरला परवानगी दिली.

मनरेगात घसरला रोजगार; ७ वर्षातला निचांक
‘फायझर-मॉडर्नापेक्षा ऑक्सफर्डची लसच फायद्याची’
देशात ओमायक्रॉनचे २०० रुग्ण

जम्मू आणि काश्मीर: अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी आलेल्या पुराच्या संदर्भात एका वृत्तामध्ये म्हटले आहे की, यावेळी ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याच ठिकाणी गेल्या वर्षी जुलैमध्येही पूर आला होता. असे असतानाही यावर्षी यात्रेकरूंसाठी त्याच ठिकाणी तंबू उभारण्यात आल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

८ जुलै रोजी अमरनाथला शुक्रवारी ढगफुटीमुळे पूर आला होता, त्यामुळे अनेक लंगर आणि यात्रेकरूंचे तंबू त्याच्या तडाख्यात आले होते, ज्यामध्ये किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक बेपत्ता आहेत. .

एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी २८ जुलै रोजीही पूर आला होता, मात्र कोणतीही हानी झाली नव्हती कारण कोविड साथीच्या आजारामुळे 2021 मध्ये यात्रा आयोजित करण्यात आली नव्हती.

ज्याला कोरड्या नदीचे पात्र म्हणूनही ओळखले जाते, त्या याच पूर वाहिनीमध्ये यात्रेकरूंसाठी यावर्षी तंबू उभारण्यात आले होते. एका वेळी जास्तीत जास्त यात्रेकरूंना सामावून घेता यावे म्हणून हे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सोबतच या कोरड्या नदीच्या पात्रात लंगर चालवण्यासही परवानगी देण्यात आली.

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका राज्य अधिकाऱ्याने सांगितले की, “तिथल्या जलवाहिनीला पूर येण्याची शक्यता होती हे सर्वश्रुत होते, पण विशेषत: वर्षाच्या या वेळी हवामान पाहता नियोजन करताना विचाराचा पूर्ण अभाव होता. मुख्य प्रयत्न फक्त (भक्तांची) वाढलेली संख्या दाखवण्याचा होता.”

गेल्या वर्षीच्या पुरानंतर आलेल्या राजभवनाच्या निवेदनात म्हटले होते, की “श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड, पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने जलदगतीने काम केले आणि नाल्याजवळ उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.” मानवी जीवित किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. ताज्या अहवालानुसार, पवित्र गुहा मंदिर सुरक्षित आहे. माननीय गृहमंत्री श्री अमित शाह यांनी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशीही चर्चा केली, त्यांनी त्यांना सद्यस्थिती आणि अधिकारी, पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.”

वृत्तानुसार, यावर्षी श्राइन बोर्डाने कोरड्या नदीच्या पात्रात पाणी वाहू नये म्हणून दोन फूट उंच दगडी भिंत बांधली होती. पण पुराच्या दिवशी काही सेकंदात भिंतीवरून पाणी बाहेर येऊन तंबूपर्यंत पोहोचले.

यात्रेच्या व्यवस्थेची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, २०१९ पूर्वी आणि त्यापूर्वीही या ठिकाणापासून दूरवर तंबू उभारण्यात आले होते.

एका अधिकृत सूत्राने सांगितले की, गेल्या वर्षी आणि २०१५ च्या पुरावर सर्व अधिकृत बैठकीत चर्चा झाली होती आणि अपेक्षित जलपातळीच्या आधारे खबरदारीचे उपाय करण्याचे ठरले होते. परंतु शुक्रवारी प्रवाहात जे पाणी शिरले ते सर्व अंदाज आणि आकडेमोडींच्या पलीकडले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0