एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री : सीतारामन

एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री : सीतारामन

मुंबई : पुढील वर्षी मार्चपर्यंत सरकारी मालकीच्या एअर इंडिया व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांची विक्री करण्यात येईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या

‘एअर इंडिया’ अखेर टाटांकडे
पाकिस्तानमुळे भारतीय विमानकंपन्यांना ५४९ कोटींचा तोटा
एअर इंडिया विकण्यास मंजुरी

मुंबई : पुढील वर्षी मार्चपर्यंत सरकारी मालकीच्या एअर इंडिया व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांची विक्री करण्यात येईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या दोन कंपन्यांपैकी एअर इंडिया कंपनी विकत घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवला आहे. या दोन कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया वर्षअखेर पूर्ण होईल असे सरकारला वाटत असून या वित्तीय वर्षांत निर्गुंतवणुकीतून एक लाख कोटी रु.चा महसूल मिळवण्याचा सरकारचे उद्दिष्ट्य आहे, ते उद्दिष्ट्य या दोन कंपन्यांच्या विक्रीतून साध्य होईल, असे त्या म्हणाल्या. एअर इंडियाच्या खरेदीबाबत सुरवातीला गुंतवणुकदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता, याचीही त्यांनी कबुली दिली.

आर्थिक मंदीबाबत भाष्य करताना सीतारामन यांनी केंद्र सरकारने आर्थिक विकासाला गती देण्यासाठी वेळीच पावले उचलली होती त्यामुळे अनेक क्षेत्रे त्यांच्या समस्यातून बाहेर येत आहेत, असे सांगितले. अनेक उद्योगपती त्यांच्या कंपन्यांचा ताळेबंद सुधारण्याचे प्रयत्न करत आहेत. अनेक उद्योगपतींनी गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रांमध्ये सुधारणा होत असल्याने जीएसटी संकलनातही वाढ होत असून सरकारने जीएसटी संकलनातील काही त्रुटी दूर कमी केल्या आहेत, त्याचे परिणाम लवकरच दिसू लागतील असे सीतारामन म्हणाल्या.

या सणासुदीच्या दिवसांत सुमारे १.८ लाख कोटी रु.चे कर्ज बँकांनी गरजूंना वितरित केले. जर ग्राहकांचा बँकांवर विश्वास नसता तर त्यांनी बँकांकडून कर्जे घेतली असती का असा सवाल करत सीतारामन यांनी ही परिस्थिती संपूर्ण देशात असल्याचा दावा केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0