नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आपण फेरयाचिका दाखल करणार असल्याचे रविवारी ऑल इंडिय
नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आपण फेरयाचिका दाखल करणार असल्याचे रविवारी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डने जाहीर केले. लखनौमध्ये बोर्डची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरयाचिका दाखल करावी असे सर्वानुमते ठरले अशी माहिती बोर्डचे सदस्य सैय्यद कासिम रसूल इलियास यांनी दिली. ही याचिका येत्या महिन्याभरात दाखल करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद बांधलेल्या वादग्रस्त जागेच्या बदल्यात पाच एकर जमीन मुस्लिम पक्षकारांना दिली होती. ही जमीन आम्हाला नको असल्याची भूमिका बोर्डने घेतली आहे.
दरम्यान, जमियत उलमा –ए-हिंद या संघटनेही पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती जमियतचे प्रमुख अर्शद मदनी यांनी दिली. रविवारी जमियतच्या कार्यकारिणीने एक बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी अशी सूचना सर्व सदस्यांनी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
मूळ बातमी
COMMENTS