गुजरात काँग्रेसवर हार्दिक पटेल नाराज

गुजरात काँग्रेसवर हार्दिक पटेल नाराज

अहमदाबादः गुजरात काँग्रेसच्या एकूण कार्यपद्धतीवर काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला पक्षाने दूर ठेव

कर्नाटकात भाजपमुळे जेडीएसकडे विधान परिषद अध्यक्षपद
‘स्वतःमध्ये बदल करण्याची काँग्रेसची इच्छा नाही’
सगळ्या एक्झिट पोलमध्ये युतीला आघाडी 

अहमदाबादः गुजरात काँग्रेसच्या एकूण कार्यपद्धतीवर काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला पक्षाने दूर ठेवले असून आपल्यातील नेतृत्व क्षमतांचा उपयोग करण्यास काँग्रेस उत्सुक नसल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी बुधवारी केला. गेल्या विधानसभा निवडणुकांत पाटीदार आंदोलनाचा फायदा काँग्रेसला झाला होता, याची आठवण हार्दिक पटेल यांनी पक्षाला करून दिली.

गुजरात काँग्रेसकडून लोकप्रिय पाटीदार नेते नरेश पटेल यांना प्रवेश दिला जात नाही, त्यावरून काँग्रेसमध्ये हार्दिक पटेल गट कमालीचा नाराज झाला आहे. बुधवारी हार्दिक पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेश पटेल यांना काँग्रेसप्रवेश देण्यासंदर्भात ज्या प्रकारची चर्चा ऐकायला मिळत आहे, ती पाहता हा पटेल समुदायाचा अवमान होत असून गेली दोन वर्षे नरेश पटेल यांच्या काँग्रेसप्रवेशाबाबत हायकमांडाच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्थानिक नेतृत्वाकडून निर्णय घेतला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नरेश पटेल यांना त्वरित पक्ष प्रवेश द्यावा अशीही त्यांनी मागणी केली.

२०१५च्या गुजरातमधील पाटीदार आंदोलनामुळे काँग्रेसला स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांत चांगल्या जागा मिळाल्या होत्या. परिणामी २०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला १८२ पैकी ७७ जागा मिळवत्या आल्या होत्या. पण त्यानंतर पुढे काय झाले असा सवाल करत हार्दिक पटेल यांनी २०१७नंतर पक्षाने आपला उपयोग करून घेतला नाही. आपल्याला पक्षात महत्त्व मिळाल्यास पक्षातील काही नेत्यांना पुढच्या ५-१० वर्षांनी हार्दिक पटेल त्यांच्यामध्ये आड येईल असे वाटत असल्याचे सांगितले.

हार्दिक पटेल यांच्या या एकूण नाराजीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी नरेश पटेल यांच्या काँग्रेसप्रवेशाचे पक्ष स्वागत करत असल्याचे सांगितले. चेंडू आता नरेश पटेल यांच्याकडे असून त्यांनीच यावर आता निर्णय घ्यावा. त्यांच्या काँग्रेसप्रवेशासाठी आम्हीच त्यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली होती, आता अंतिम निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, अशी ठाकोर यांनी प्रतिक्रिया दिली.

येत्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0