जिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला

जिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला

अहमदाबादः गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी व जेएनयूतील माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार येत्या २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत

धर्मगुरुच्या दफनविधीस हजारोंची उपस्थिती
केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन
दुपारी चहा-कॉफी घेता का?

अहमदाबादः गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी व जेएनयूतील माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार येत्या २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शनिवारी मेवानी यांनी ही घोषणा केली. आपण व कन्हैया कुमार दोघेही २८ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करत आहोत, असे मेवानी यांनी पीटीआयला सांगितले.

पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत असून त्या दृष्टीने राज्यात विविध राजकीय हालचाली होत आहेत. त्या दृष्टीने मेवानी यांचा काँग्रेस प्रवेश पक्षाच्या फायद्याचा होऊ शकतो. मेवानी हे गुजरातमधील प्रभावशाली दलित नेते आहेत. २०१७मध्ये बनासकंठा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. तर २०१९च्या लोकसभा निवडणुकांत बिहारमधील बेगुसराय येथून कन्हैया कुमार यांनी माकपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला होता.

मेवानी व कन्हैया यांचा काँग्रेस प्रवेश हा नवी दिल्लीत होणार असून या प्रसंगी गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दीक पटेल व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.

मेवानी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे गुजरात काँग्रेस अधिक मजबूत होईल, असा विश्वास हार्दीक पटेल यांनी व्यक्त केला आहे. २०१७मध्ये मेवानी यांच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा होता, त्यांच्या प्रवेशाने गुजरात काँग्रेसला भाजपच्या भ्रष्टाचारी सरकारविरोधात लढण्यास अधिक बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरातमधील प्रवक्ते मनीश दोषी यांनी व्यक्त केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0