भारतातल्या वाढत्या असहिष्णुतेला यूट्यूबचे बळ

भारतातल्या वाढत्या असहिष्णुतेला यूट्यूबचे बळ

नवी दिल्लीः भारतात वाढती असहिष्णुता, धार्मिक विद्वेष प्रसाराला सोशल मीडियाने अधिक बळ दिल्याचे निरीक्षण न्यू यॉर्क विद्यापीठातील स्टर्न सेंटर फॉर बिझने

‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
कर्नाटक : मुस्लिम मांस विक्रेत्यावर हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ला
इंग्लंडमध्ये सांप्रदायिक संघर्ष: ४७ जणांना अटक

नवी दिल्लीः भारतात वाढती असहिष्णुता, धार्मिक विद्वेष प्रसाराला सोशल मीडियाने अधिक बळ दिल्याचे निरीक्षण न्यू यॉर्क विद्यापीठातील स्टर्न सेंटर फॉर बिझनेस अँड ह्युमन राइट्सने आपल्या अहवालात नोंदवले आहे. ‘ए प्लेटफॉर्म ‘वेपनाइज्ड’: हाउ यूट्यूब स्प्रेड्स हार्मफुल कंटेंट- अँड व्हॉट कॅन बी डन अबाउट इट’ या अहवालात भारतातील सत्ताधारी राजकीय पक्ष भाजप व त्यांच्यासोबत असलेल्या कट्टरवादी संघटनांनी मुसलमानांविरोधात विद्वेष निर्माण करण्यासाठी सोशल मीडियातील यूट्यूब या माध्यमाचा सर्वाधिक वापर केल्याचे म्हटले आहे.

यूट्यूबद्वारे सामाजिक पातळीवर असहिष्णुता, हिंसा  निर्माण करणारे साहित्य पसरवले जात असल्याचे या अहवालाचे म्हणणे आहे. भारतात विविध मुद्द्यांवर षडयंत्र रचल्याचे गृहितके उभी केली जातात. कोरोना महासाथीचे संक्रमण मुसलमानांकडून वाढले व हाच समाज त्याला कारणीभूत होता असा प्रचार सुरू करण्यात आला होता. यात मुसलमान व्यापाऱ्यांकडून कोणतीही वस्तू खरेदी करू नये, त्यांच्या मालावर बहिष्कार घालावा अशा मागण्याही सुरू झाल्या होत्या. कोरोना महासाथीला जिहादचे रुप देण्यात उजवे गट अधिक सक्रीय होते व यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्याचे या अहवालात म्हटले आहे.

भारतात धार्मिक असहिष्णुता पूर्वीही होती पण सोशल मीडियाच्या आगमनानंतर या धार्मिक विद्वेषाला अधिक खतपाणी घालण्यात आले. भारतात यूट्यूबची मोठी बाजारपेठ आहे. तिचा वापर कडव्यांकडून केला जातो. ऑनलाइनवर महिलांना धमकवण्याच्या घटना या मुस्लिम विरोधी विषयाशी जोडल्या जातात. यूट्यूबवर देशप्रेमाचा सतत प्रचार करणारे विशेषतः मुस्लिम विरोधात पुढे असतात, असे निरीक्षण या अहवालात मांडण्यात आले आहे.

या अहवालात सुल्ली डील्स व बुली बाई अँप्स यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

स्टर्न सेंटर फॉर बिझनेस अँड ह्युमन राइट्सच्या अहवालात अमेरिकेतील मानवाधिकार उल्लंघनावर अधिक भर देण्यात आला आहे. त्याच बरोबर ब्राझील व म्यानमारमधील बिघडलेली परिस्थिती याचाही उल्लेख करण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये उजव्या कट्टरवादी संघटना आणि म्यानमारमधील लष्कराच्या दमनशाहीचे समर्थक सोशल मीडियावर आक्रमक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. द. कोरियात महिलांच्या विरोधातही काही उजवे आक्रमक गट सोशल मीडियाचा वापर करत असतात. सोशल मीडियामुळे अनेक कट्टर आक्रमक गट एकत्र येत असतात असेही या अहवालातील एक निरीक्षण आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0