बंगळुरात ३ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा पत्ता खोटा

बंगळुरात ३ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा पत्ता खोटा

बंगळुरूः शहरात कोरोनाची लागण झालेल्या सुमारे ३ हजाराहून अधिक रुग्णांची माहिती मिळत नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दि

बंगळुरू दंगलः एसडीपीआय संघटनेची चौकशी सुरू
तरुणीने दिल्या पाकिस्तान-हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा
कर्नाटकात बेड घोटाळा; तेजस्वी सूर्यांवर ध्रुवीकरणाचे आरोप

बंगळुरूः शहरात कोरोनाची लागण झालेल्या सुमारे ३ हजाराहून अधिक रुग्णांची माहिती मिळत नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बंगळुरात ३,३३८ कोरोना रुग्ण असे आहेत की, या रुग्णांनी कोरोनाची तपासणी प्रयोगशाळेत केली आहे, त्यांना कोरोनाही झाला आहे पण त्या प्रयोगशाळेत त्यांनी नोंदवलेले पत्ते व मोबाइल क्रमांक खोटे आहेत. त्यामुळे या रुग्णांचा शोध घेणे कठीण झाले असल्याचे शहराचे आयुक्त एन. मंजूनाथ प्रसाद यांनी सांगितले. या रुग्णांनी स्वतःचे विलगीकरण केले आहे की नाही याचीही माहिती मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या १४ दिवसांत बंगळुरात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा २७ हजार इतका झाला असून या रुग्णांपैकी पत्ता मिळत नसलेले ३,३३८ रुग्ण आहेत. यांची एकूण कोरोनाबाधित रुग्णांमधील टक्केवारी ७ टक्के इतकी आहे. बंगळुरातील कोरोना रुग्णांची संख्या कर्नाटक राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येच्या दुप्पट आहे.

शनिवारी कर्नाटकात कोरोनाचे ५,०७२ नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे राज्यातील कोरोनो रुग्णांची संख्या ९०,९४२ इतकी झाली आहे. तर कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या १,७९६ इतकी झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0