उलुबेरिया (प. बंगाल)- प. बंगालमधील हावडा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष या नेत्याच्या घरात ४ ईव्हीएम व ४ व्हीव्हीपॅटचे यंत्र आढळले. या प्रक
उलुबेरिया (प. बंगाल)- प. बंगालमधील हावडा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष या नेत्याच्या घरात ४ ईव्हीएम व ४ व्हीव्हीपॅटचे यंत्र आढळले. या प्रकरणानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकार्याला निलंबित केले आहे. ही घटना उलुबेरिया उत्तर मतदार संघातील तुलसीबेरिया या गावांतील आहे. या प्रकरणात जप्त करण्यात आलेली ४ ईव्हीएम पुन्हा मतदानासाठी वापरली जाणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील अहवालही निवडणूक आयोगाने मागवला आहे.
मंगळवारी तृणमूल नेत्याच्या घराबाहेर निवडणूक आयोगाचे स्टीकर असलेले वाहन दिसल्यानंतर ग्रामस्थांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. या नेत्याच्या घरात निवडणूक अधिकारी तपन सरकार ईव्हीएमसह उपस्थित होते. हे वृत्त कळाल्यानंतर ग्रामस्थांनी निदर्शने सरू केली.
तपन सरकार यांनी सोमवारी रात्री मतदान केंद्र बंद असल्याचे लक्षात आल्याने ईव्हीएम आपल्या नातेवाईकाकडे घेऊन थांबावे लागल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नातेवाईकाचे घर सुरक्षित असल्याने तेथे थांबणेच महत्त्वाचे होते, असा दावाही त्यांनी केला.
केरळ, तामिळनाडूत, पुड्डूचेरीत उत्स्फुर्त मतदान
मंगळवारी ४ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ७५० विधानसभा जागांसाठी उत्स्फुर्त मतदान झाले. तामिळनाडू, केरळ, पुड्डूचेरी येथे एकच मतदान फेरी होती. तेथे अनुक्रमे ६५.१९ टक्के, ७०.२९ टक्के, ७८.९० टक्के इतके मतदान झाले. आसाममध्ये तिसर्या व शेवटच्या टप्प्यातले मतदान ८२.३३ टक्के इतके झाले तर प. बंगालमध्ये तिसर्या टप्प्यासाठी ७७.६८ टक्के इतके झाले.
मूळ बातमी
COMMENTS