रुपया नीचांकी पातळीवर

रुपया नीचांकी पातळीवर

सोमवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ६० पैशांनी घसरून ७७.५० या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.

पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर घसरून ५ टक्क्यांवर
मूडीजने भारताचे गुणांकन ‘नकारात्मक’ केले
‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’

मुंबई/नवी दिल्ली: परदेशातील बाजारातील अमेरिकी चलनाची स्थिरता आणि परदेशी भांडवलाचा सतत होणारा ओघ यामुळे सोमवारी रुपया 60 पैशांनी घसरून 77.50 (तात्पुरता) या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.

वाढत्या चलनवाढीच्या चिंतेमुळे आणि जागतिक मध्यवर्ती बँकांकडून दरात आणखी वाढ होण्याची भीती यामुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत असल्याचे विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी सांगितले.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.१७ वर घसरला आणि नंतर ७७.५० वर येऊन थांबला. मागील किंमतीच्या तुलनेत ही घसरण ६० पैशांची आहे.

दिवसाच्या व्यवहारादरम्यान रुपया ७७.५२ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. यापूर्वी, गेल्या आठवड्यात शुक्रवारी रुपया ५५ पैशांनी घसरून ७६.९० वर आला होता.

गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ११५ पैशांनी घसरले आहे.

दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.३३ टक्क्यांनी वाढून १०४ वर पोहोचला.

जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड वायदा १.६८ टक्क्यांनी घसरून ११०. ५० डॉलर प्रति बॅरल झाले.

अर्थव्यवस्थेवर सरकारचा बुलडोझर, रुपया आयसीयूमध्ये पाठवला: काँग्रेस

दुसरीकडे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवरून काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि सरकारने धोरण लकवा, धार्मिक संघर्ष आणि भ्रष्टाचाराने अर्थव्यवस्थेवर बुलडोझर चालवल्याचा आणि रुपयाला आयसीयूमध्ये पाठवल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १०० रुपयांहून अधिक आणि एलपीजीच्या किमती १००० रुपयांहून अधिक वाढवण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी आधीच गाठले आहे. आता रुपया १०० च्या दिशेने जाण्याची पाळी आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0