श्रीलंकेत आंदोलन चिघळले

श्रीलंकेत आंदोलन चिघळले

कोलंबोः श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी सोडल्यानंतर मंगळवारी देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून सार्वजनिक संपत

गोटाबाया राजपक्षे पळाले, श्रीलंकेत आणीबाणी
१९७४ सालचे ‘आंदोलनजीवी’ नरेंद्र मोदी
अघोषित आणीबाणीची ७ वर्षे

कोलंबोः श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी सोडल्यानंतर मंगळवारी देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून सार्वजनिक संपत्ती लुटणाऱ्यांना व दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश लष्कराला व पोलिसांना देण्यात आले आहेत.

देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडल्याने हजारो आंदोलक रस्त्यावर येऊन सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. या निदर्शकांची सरकार समर्थकांशीही चकमक घडत असून इंधन, अन्नधान्य व वैद्यकीय मदत यांची मोठ्या प्रमाणात टंचाई श्रीलंकेच्या नागरिकांना जाणवत असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी राजधानी कोलंबो येथे शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते व त्यांनी राजकीय नेत्यांच्या घरांना आगी लावण्याचे प्रयत्न केले. काही निदर्शक महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानी जमा झाले होते व त्यांच्याकडून आग लावण्याचे प्रकार घडले. शहरातही अशीच परिस्थिती दिसत होती. या हिंसाचारात दुकाने व व्यवसायही सुटले नाहीत. सार्वजनिक परिवहनाच्या बसही आंदोलकांनी जाळल्या. हिंसाचाराचे लोण पसरू नये म्हणून लष्कराने कोलंबोचा ताबा घेतला असून मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हवाई दलालाही दक्षतेता इशारा देण्यात आला आहे. शेकडो आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. कोणतेही वॉरंट न बजावता आंदोलकांना ताब्यात घेण्याचे अधिकारही लष्कर व पोलिसांना मिळाले आहेत.

(छायाचित्र – अलजझीरा )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0