पिगॅसस फक्त सरकारांना विकले जाते : इस्रायल राजदूत  

पिगॅसस फक्त सरकारांना विकले जाते : इस्रायल राजदूत  

इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन म्हणाले, की पिगॅसस स्पायवेअरबाबत भारतात जे काही घडत आहे ती त्यांची अंतर्गत बाब आहे, परंतु आम्ही एनएसओसारख्या कंपन्यांना केवळ सरकारला निर्यात करण्यासाठी निर्यात परवाने देतो.

बीईएलचा ईव्हीएम, व्हीव्हीपॅट डेटा उघड करण्यास नकार
काश्मीरमध्ये न्यायव्यवस्था विस्कळित
बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली

इस्रायलचे भारतातील नवनियुक्त राजदूत नाओर गिलोन यांनी गुरुवारी पिगॅसस स्पायवेअर वाद हा भारताचा ‘अंतर्गत बाब’ असल्याचे सांगितले आणि एनएसओसारख्या कंपन्या त्यांची उत्पादने गैर-सरकारी संस्था, संस्था किंवा व्यक्तींना विकू शकत नाहीत, असे सांगितले.

अनधिकृत पाळत ठेवण्यासाठी इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपचे स्पायवेअर ‘पिगॅसस’ वापरल्याच्या आरोपावरून नाओर गिलोन यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. याप्रकरणी भारत सरकारने इस्रायलशी संपर्क साधला होता, का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नांना उत्तर देताना नाओर गिलोन यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी २७ ऑक्टोबर रोजी एनएसओच्या स्पायवेअर पिगॅससद्वारे पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकारण्यांसह भारतीय नागरिकांची कथित हेरगिरी केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश आर.व्ही. रमणा यांनी माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती नियुक्त केली. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की सरकार प्रत्येक वेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली पळून जाऊ शकत नाही. अशा वेळी नाओर गिलोन यांचे वक्तव्य आले आहे

इस्रायली राजदूत म्हणाले, की पिगॅससबाबत भारतात जे काही घडत आहे, ती त्यांची अंतर्गत बाब आहे. “मी अधिक तपशीलात जाणार नाही,” ते म्हणाले एनएसओ ग्रुप ही खाजगी इस्रायली कंपनी आहे.

“एनएसओ किंवा अशा कंपन्यांना प्रत्येक निर्यातीसाठी इस्रायली सरकारकडून निर्यात परवाना आवश्यक आहे. आम्ही फक्त सरकारला निर्यातीसाठी निर्यात परवाना देतो.

इस्रायली राजदूत पुढे म्हणाले, “एकमात्र मुख्य अट म्हणजे, ते गैर-सरकारी घटकांना स्पायवेअर विकू शकत नाहीत. भारतात जे काही चालले आहे, ती त्यांची अंतर्गत बाब आहे आणि मी तुमच्या अंतर्गत बाबींमध्ये जाणार नाही.

‘द वायर’चा समावेश असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मीडिया कन्सोर्शियमने नुकताच वृत्तमालिका प्रसिद्ध करून हे उघड केले आहे, की इस्रायलच्या एनएसओ ग्रुप कंपनीच्या पिगॅसस स्पायवेअरद्वारे राजकारणी, पत्रकार, कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी यांचे फोन कथितपणे हॅक केले गेले.

या मालिकेमध्ये १८ जुलैपासून, ‘द वायर’सह जगभरातील १७ माध्यम संस्थांनी, उघड झालेल्या ५० हजारहून अधिक मोबाइल नंबरच्या माहितीवर वृत्त प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ज्यांच्या फोनवर पिगॅसस स्पायवेअरद्वारे पाळत ठेवली जात होती, किंवा ते संभाव्य पाळत ठेवण्याचे लक्ष्य होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0