महागाई दर ७.३५ टक्के, ५ वर्षातला उच्चांक

महागाई दर ७.३५ टक्के, ५ वर्षातला उच्चांक

नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती व दूरसंचार कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे गेल्या डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका पोहचला आहे. हा दर गेल्य

कोविड मृत्यूंची अचूक आकडेवारी प्राप्त करण्याचे उपाय
स्वतंत्र मणिपूरची घोषणा करणाऱ्याला एनआयएकडून अटक
महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन

नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती व दूरसंचार कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे गेल्या डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका पोहचला आहे. हा दर गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च असून महागाई अजून वाढण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महागाई दर ५.५४ टक्के इतका होता तर २०१८सालच्या डिसेंबरमध्ये हा दर केवळ २.११ टक्के होता.

काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्ग व रॉयटर्सने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ५० अर्थतज्ज्ञांनी महागाईचा दर ६.७ व ६.२ टक्के इतका जाईल असा अंदाज वर्तवला होता. पण आता हे दोन्ही अंदाज चुकले आहेत.

महागाई वाढण्यात कांद्याचे गगनाला भिडलेले दर, बिघडलेले हवामान हेही घटक कारणीभूत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. लवकरच अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ६.५ टक्के इतका अपेक्षित मानला गेला आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात महागाई रोखण्यासाठी सरकारला बरीच कसरत करावी लागणार आहे.

महागाई वाढण्यामागची कारणे

घटक डिसेंबर १९मधील महागाई दर नोव्हेंबर २०१९मधील महागाई दर
भाज्या ६०.५ % ३५.९९%
डाळी व अन्य उत्पादने १५.४४% १३.९४%
वाहतूक व दूरसंपर्क ४.७७% ०.८८ %
अंडी ८.७९% ६.२० %

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: