अमित शहांच्या दौऱ्याआधीच काश्मीरात इंटरनेट बंद

अमित शहांच्या दौऱ्याआधीच काश्मीरात इंटरनेट बंद

श्रीनगरः या आठवड्याच्या अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरच्या काही भागांचा दौरा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काश्मीर खोर्यातील का

दिल्ली दंगलीत पत्रकारांवर हल्ले
या आंदोलनाचा अर्थ काय?
‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक

श्रीनगरः या आठवड्याच्या अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरच्या काही भागांचा दौरा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काश्मीर खोर्यातील काही भागात इंटरनेट बंद केले आहे. त्याच बरोबर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. पण पोलिसांच्या मते अमित शहा यांच्या काश्मीर दौर्याचा या घटनांशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे प्रतिबंधक उपाय दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी करण्यात येतात, असे काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटद्वारे सांगितले.

अमित शहा यांचा दौरा शनिवारी, २३ ऑक्टोबरला सुरू होत आहे. या दिवशी श्रीनगरहून शारजाहला पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाणही होणार आहे. त्याचा उद्घाटन अमित शहा करणार आहेत.

२०१९मध्ये जम्मू व काश्मीरला विशेष अधिकार देणारे राज्य घटनेतील ३७० कलम रद्द केल्यानंतर अमित शहा यांचा हा पहिलाच येथे दौरा आहे. गेले दोन दिवस संपूर्ण काश्मीर खोर्यात दुचाकी वाहने ताब्यात घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक वाहनधारकांकडे कागदपत्रे असूनही त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्याच्या काही तक्रारी दिसून आल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्या २६ ऑक्टोबरला परत मिळतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

त्याच बरोबर एक डझनहून अधिक इंटरनेट टॉवर बंद करण्यात आले आहेत. ज्या भागात दहशतवाद्यांनी ११ मजुरांना ठार मारले आहे, त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमित शहा यांचा तीन दिवसांचा काश्मीर दौरा असून ते शनिवारी श्रीनगर येथे पोहचतील. तेथे काश्मीरमधील सुरक्षे संदर्भात एक बैठक घेतील. नंतर ते जम्मूला जाणार आहेत.

जम्मू व काश्मीर भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील शर्मा यांनी अमित शहा श्रीनगरहून जम्मूला जाणार असल्याचे सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: