इसिसचा म्होरक्या अबू-बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार

इसिसचा म्होरक्या अबू-बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार

वॉशिंग्टन : इस्लामी दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी सीरियातील प्रांत इदलिब येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती अमेर

ट्रम्प यांचा दौरा आटोपला, सीएएवर भाष्य नाही
घरासारखी सुंदर जागा या जगात नाही…
वॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत?

वॉशिंग्टन : इस्लामी दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी सीरियातील प्रांत इदलिब येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी व्हाइट हाऊसमध्ये दिली.

सीरियातील इदलिब प्रांतातील बरिशा या गावात एका भुयारात बगदादी लपून बसला होता. त्या ठिकाणावर अमेरिकेच्या हवाई दलाने रात्री हल्ला केला. पण या हल्ल्याने बिथरल्याने बगदादी पळून जात असताना त्याने स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले, त्यात तो कुत्र्यासारखा तडफडून मेला असे ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अमेरिकेच्या सैन्याची ही थरारक मोहीम, एखादा चित्रपट पाहात असल्याचा अनुभव होता तो आपण व्हाइट हाऊसमध्ये बसून प्रत्यक्ष पाहिला, असेही ट्रम्प यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

बगदादी सोबत त्याची ११ मुले होती. त्यातील तीन मुले ठार झाली असून अन्य जखमी मुले एका अज्ञात गटासोबत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. बगदादी याच्या मृतदेहाची ओळख अमेरिकेच्या सैन्याने पटवली असून त्याच्या डीएनए चाचणीनुसार तो बगदादीच होता. आता तो मेल्याने जग सुरक्षित झाल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

ज्या व्यक्तीने जगाला दहशतीच्या छायेत नेले तो बगदादी अत्यंत भेकड होता. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे तो सैरावैर धावत सुटला पण मरण समोर दिसल्यानंतर त्याने स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले. मरताना तो किंचाळत होता. अत्यंत भित्रा, पळपुटा व रडका बगदादी कायमचा मेला. त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता, असे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे यश

बगदादीला ठार मारल्याने दहशतवादी संघटना इसिसचा कणाच मोडला असून या संघटनेचे नवे नेतृत्व उभे राहू नये म्हणून अमेरिका प्रयत्न करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. बगदादीच्या मृत्यूनंतर या संघटनेची कोण धुरा घेतेय याकडेही अमेरिकेचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी या कारवाईच्या यशात कुर्दीश बंडखोर, रशिया, तुर्की, सीरिया व इराक यांचेही आभार मानले आहेत.

ट्रम्प यांच्यावर महाभियोग खटला चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतानाच बगदादीला ठार मारल्याने अमेरिकेच्या राजकारणात ट्रम्प यांचे खालावलेले स्थान बळकट होईल असे बोलले जाते. पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बगदादीवरच्या या कारवाईचा राजकीय फायदा ट्रम्प घेणार हेही आता जवळपास निश्चित झाले आहे.

‘मोस्ट वाँटेड मॅन’

सुमारे दहा वर्षे इसिसच्या दहशतवादाने सीरिया व इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर यादवी माजली आहे. या यादवीला खरा कारणीभूत होता तो बगदादी. इस्लामी खिलाफतच्या नावाने बगदादीने सीरिया व इराकमध्ये स्वत:ची सशस्त्र संघटना उभी करून सीरिया व इराकचे काही भाग आपल्या ताब्यात घेतले होते. निष्पापांचे नृशंस हत्याकांड, दहशतीच्या जोरावर महिलांना, मुलांना वेठीस ठरणे हा इसिसच्या राजकीय धोरणाचा एक भाग होता. त्याच्या कट्‌टर इस्लामी विचासरणीकडे आत्कृष्ट होऊन जगभरातून अनेक तरुण इसिसमध्ये सामील झाले होते. त्यांच्या बळावर बगदादीने इसिसची फौज उभी केली होती. त्याला सीरिया व इराकमधील बंडखोर व दहशतवादी संघटनांकडून शस्त्रास्त्रेही मिळत होती. त्याच्या जोरावर त्याने सीरिया, अमेरिका, तुर्की, रशियाला आव्हान दिले होते.

बगदादीच्या वाढत्या कारवायांनी पश्चिम आशियाचा नकाशाही काही काळ बदलला होता. इराकमधील उत्तरेकडील मोठा भाग काही काळ इसिसच्या ताब्यात होता. त्यामुळे बगदादीला जिवंत पकडून देण्यास अडीच कोटी डॉलर एवढे इनाम अमेरिकेने ठेवले होते.

बगदादीला पकडण्यासाठी अमेरिकेने सीरियाच्या मदतीने अनेक गुप्त मोहीमा आखल्या होत्या. पण बगदादी नेहमीच हातावर तुरी देऊन पळून जात होता.

गेल्या दोन वर्षांत इसिसची सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने बगदादी मेल्याच्या अनेक वार्ता प्रसृत होत होत्या. पण त्याला दुजोरा मिळत नव्हता. तो मेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनंतर बगदादीच्या ऑडिओ क्लिप प्रसिद्ध होत असायच्या. त्याने ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या साथीदारांशी, संघटनेशी संबंध ठेवले होते.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये श्रीलंकेत इस्टरच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात अडीचशेहून अधिक नागरिक ठार झाले होते. या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारा एक व्हिडिओ बगदादी याने जाहीर केला होता. असा व्हिडिओ सुमारे पाच वर्षानंतर प्रसिद्ध झाल्याने बगदादी जिवंत असल्याचे जगाला कळाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0