झारखंडचे मुक्त पत्रकार रुपेश कुमारवर आणखी २ फिर्यादी

झारखंडचे मुक्त पत्रकार रुपेश कुमारवर आणखी २ फिर्यादी

नवी दिल्लीः झारखंडमधील मुक्त पत्रकार रुपेश कुमार यांच्याविरोधात अन्य नवे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या १७ जुलैला रुपेश कुमार यांच्यावर यूएप

एनआरसीवरून मोदींनी घुमजाव का केले?
काश्मीरात पोलिसांच्या बसवर हल्ला, २ पोलिस ठार
खासगीकरणाद्वारे ६ लाख कोटी मिळवण्याची केंद्राची नवी योजना

नवी दिल्लीः झारखंडमधील मुक्त पत्रकार रुपेश कुमार यांच्याविरोधात अन्य नवे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या १७ जुलैला रुपेश कुमार यांच्यावर यूएपीए व आयपीसी अंतर्गत काही गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. आता दोन नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला गुन्हा बोकारो जिल्ह्यात जागेश्वर पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीवर असून दुसरा गुन्हा बिहारमधील रोहतास जिल्ह्यात २६ एप्रिलला दाखल झालेल्या तक्रारीवर आहे. या तक्रारीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे.

बोकारोमध्ये जी फिर्याद नोंद करण्यात आली आहे, त्यात ७ आरोपींच्या नावात रुपेश कुमार यांचे नाव नाही पण या आरोपींवर माओवादी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, फिर्यादीत अज्ञात लोकांचे नाव असल्याने रुपेश कुमार यांच्यावर गुन्हा नोंदवला जात आहे. हे गुन्हे दंगल घडवणे, शस्त्रास्त्रे बाळगणे, बेकायदा सभा घेणे, खूनाचा प्रयत्न आदी स्वरुपाचे आहेत. दुसऱ्या गुन्ह्याचा तपास रोहतास पोलिसांकडून सुरू आहे. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत बिहार व झारखंडमध्ये भाकप (माओवादी)कडून कटकारस्थान व नवी भरती संदर्भाचे उल्लेख आहेत. या फिर्यादीत भारत सरकारविरोधात युद्ध पुकारणे, शस्त्रास्त्रे गोळा करणे, राजद्रोह व कटकारस्थान रचणे अशा कलमांचा समावेश आहे. तसेच यूएपीए कायद्यातील काही कलमांचाही समावेश आहे.

१७ जुलैला रुपेश कुमार यांना माओवाद्यांशी संबंध असल्याचा कारणावरून पोलिसांनी अटक केली होती. पण त्या आधी जून २०१९मध्येही रुपेश कुमार यांना अटक करण्यात आली होती. पण पोलिस ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करू शकले नाहीत, त्यामुळे रुपेश कुमार यांना जामीन मिळाला होता.

दरम्यान द वायरशी बोलताना रुपेश कुमार यांचे वकील श्याम यांनी आरोप केला की, रुपेश कुमार यांच्यावर सतत फिर्यादी दाखल करून त्यांना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. असेच प्रकार दिल्ली दंगलीतील संशयितांविरोधात केले जात आहेत, तसाच पॅटर्न इथे राबवला जात आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0