जामिया मिलिया व अलिगड मुस्लिम विद्यापीठात पोलिसांची दडपशाही

जामिया मिलिया व अलिगड मुस्लिम विद्यापीठात पोलिसांची दडपशाही

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्य भारत व आसाममधील हिॅसाचाराचे लोण रविवारी नवी दिल्ली व अलिगडमध्ये दिसून आले. या विधेयकाच्या वि

अलिगढ विद्यापीठात पोलिसांची क्रूर मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ
शार्जिल इमामला बिहारमधून अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
विवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्य भारत व आसाममधील हिॅसाचाराचे लोण रविवारी नवी दिल्ली व अलिगडमध्ये दिसून आले. या विधेयकाच्या विरोधात जामिया मिलिया विद्यापीठ व अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली असता पोलिसांनी विद्यापीठ कुलगुरुंची परवानगी न घेता दोन्ही विद्यापीठात प्रवेश केला व विद्यार्थ्यांवर जोरदार लाठीमार केला व अश्रुधुराचा वापर केला.

पोलिसांच्या लाठीमारात अलिगड विद्यापीठातील सुमारे ५० विद्यार्थी जबर जखमी झाले असून त्यांना इस्पितळात हलवण्यात आले आहे. अलिगड शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास जामिया मिलियातील आंदोलनात अटक झालेल्या ५० विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी सोडल्यानंतर हा संघर्ष संपला. कालकाजी पोलिस ठाण्यातून ३५ व न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यातून १५ विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडले. त्या अगोदर रविवारी अल्पसंख्याक आयोगाने कालकाजी पोलिस ठाण्याच्या प्रभारींना एक पत्र लिहून जखमी विद्यार्थ्यांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका केल्यानंतर हे आंदोलन थांबले. या आंदोलनात दोन पोलिस जखमी झाले आहेत.

अल्पसंख्याक आयोगाचे आदेश

अल्पसंख्याक आयोगाचे आदेश

कुलगुरु म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सोबत
रविवारी दिवसभर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर जामिया मिलिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी तीव्र टीका केली आहे. माझ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून ज्या पद्धतीने वर्तन केले गेले आहे त्याने मला दु:ख झाले असून ही लढाई केवळ त्यांची नसून मीही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

समाजकंटकांनी पेटवल्या चार बसेस
रविवारी जामिया विद्यापीठाच्या सराई जुलैना व मथुरा रोड भागात दिल्ली परिवहन मंडळाच्या चार बसेस समाजकंटकांनी पेटवल्या. त्या घटनेनंतर दिल्ली पोलिस जामिया विद्यापीठात घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांना जोरदार मारहाण केली. काही विद्यार्थ्यांच्या पायावर गोळ्याही लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरले होते
दरम्यान दक्षिण दिल्लीतल्या हिंसाचारात आम्ही कोणीही सामील नव्हतो असे जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी व शिक्षक संघटनांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा विरोध शांततेत व अहिंसात्मक होता व त्याला कलंक लावण्यासाठी समाजकंटकांनी हिंसा केली असे या संघटनांचे म्हणणे आहे.
हैदराबादमध्येही रविवारी वादग्रस्त नागरिकत्व कायद्यावरून मौलाना आझाद उर्दू विद्यापीठात विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली. सर्व विद्यार्थी संघटनांनी परीक्षांवरही बहिष्कार घातला आहे.

सिसोदियांचा भाजपवर आरोप
जामिया मिलिया विद्यापीठात जे काही घडले त्याला दिल्ली पोलिस व भाजप जबाबदार असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुखमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. भाजपने दिल्ली पोलिसांच्या मदतीने बसेसना आग लावली असाही आरोप त्यांनी केला आहे. सिसोदिया यांनी या संदर्भातील काही छायाचित्रे त्यांच्या ट्विटर खात्यावर प्रसिद्ध केली आहेत. त्यांनी दिल्लीतला सर्व शाळांना सोमवारी सुटी दिली आहे.

सरकार भेकड – प्रियंका गांधी
जामिया मिलिया व अलिगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बड्या विद्यापीठात पोलिस घुसून विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने अत्याचार करत आहेत ते पाहता मोदी सरकार जनतेच्या आवाजाला घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केला. या देशातील तरुणांच्या हिंमतीला व साहसाला हे हुकुमशाही सरकार दाबत असून या तरुणांचा आवाज आज ऐकला गेला नाही तरी तो उद्या ऐकावाच लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले. हे सरकार भेकड आहे असाही आरोप त्यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0