जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी तळावर हल्ला – तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी तळावर हल्ला – तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

गुरुवारी पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आत्मघाती गटाच्या बरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि तीन जवान ठार झाले.

लष्करातील व्यभिचार गुन्हाच ठरवाः केंद्राची भूमिका
मेहबूबा, ओमर नजरकैदेत
अग्निपथ भरतीत सहकार्य नसल्याने लष्कर पंजाबवर नाराज

जम्मू: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एका संशयित आत्मघाती गटाने लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवान शहीद झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

या हल्ल्यात आणखी दोन जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंह म्हणाले, “काही लोकांनी (दहशतवाद्यांनी) पारगलमधील लष्करी छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली.

लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दोन दहशतवादी राजौरीच्या पारगलमध्ये अंधारात चौकीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सतर्क जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, दहशतवादी मारले गेले आहेत.

एडीजीपी म्हणाले की, दारहाल पोलिस स्टेशनपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या लष्करी छावणीत अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भारतीय लष्कराने हे ऑपरेशन आता संपले असल्याची माहिती दिली आहे.

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. १६ कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग जमिनीवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला.

अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, ‘राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याबद्दल ऐकून खूप दुःख झाले. मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि शोकसंतप्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. हल्ल्यात जखमी झालेले अधिकारी आणि जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0