पाकिस्तानच्या गोळीबारात ४ जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात ४ जवान शहीद

श्रीनगरः जम्मू व काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गुरेज व उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी पाकिस्तान सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबा

तामिळनाडूत दलित युवकाची जमावाकडून हत्या
त्राता तेरे कई नाम
८०० पाकिस्तानी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारले

श्रीनगरः जम्मू व काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गुरेज व उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी पाकिस्तान सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात ४ जवान शहीद व ३ भारतीय नागरिक तर पाकिस्तानचे ७ ते ८ जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीतील दोन बंकरही उध्वस्त केले आहेत. या बंकरमध्ये पाकिस्तानचा दारुगोळा व इंधनचा साठा होता. हे साठे क्षेपणास्त्र व रॉकेट डागून उध्वस्त केल्याचा व्हीडिओ भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला.

ही चकमक उरीमधील नंबला सेक्टरमध्ये झाली. तेथे ३ भारतीय जवान शहीद झाले तर हाजी पीर सेक्टरमध्ये बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोभाल शहीद झाले. तसेच कॉन्स्टेबल वासू राजा हे जखमी झाले आहेत.

राकेश डोभाल २००४मध्ये बीएसएफमध्ये सामील झाले होते. ते उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथील निवासी असून त्यांच्या मागे वडील, पत्नी व ९ वर्षांची मुलगी आहे.

तर किबारामुला जिल्ह्यातल्या कमलकोट सेक्टरमध्ये दोन नागरिक तर हाजी पीर सेक्टरमध्ये एक महिला चकमकीत ठार झाली.

दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानने ही आगळीक केली आहे. उरी व्यतिरिक्त पाकिस्तानने बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टर, कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा एक प्रयत्नही भारताने हाणून पाडला. गेल्या ७-८ नोव्हेंबरच्या रात्री माछिल सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडला होता. पण त्यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या ३ जवानांसह बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता.

लेखाचे छायाचित्र – भारत पाकिस्तान सीमेवर गोळीबार सुरू असताना आकाशात उठलेले धुळीचे लोट.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: