पासवान भाजपच्या विरोधात लढणार

पासवान भाजपच्या विरोधात लढणार

नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सामील असलेल्या रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टीने झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपशी काडीमोड करत स्वत:च

नवं भागवत पुराण
मोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा?
सगळ्या एक्झिट पोलमध्ये युतीला आघाडी 

नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सामील असलेल्या रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टीने झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपशी काडीमोड करत स्वत:च निवडणुकांना सामोरे जायचा निर्णय घेतला आहे. भाजपने आमच्यासोबत येण्याबाबत फारशी इच्छा दाखवली नाही. प्रादेशिक पक्ष राज्यातल्या जनतेला काही देऊ शकत नाही अशी भाजपची भूमिका असल्याचे आम्ही ५० विधानसभा जागांवर स्वत:चे उमेदवार लढवणार आहोत अशी घोषणा लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मंगळवारी केली. लोक जनशक्ती पार्टी व भाजपची बिहारमध्ये युती आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपने आपल्या ५२ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर सोमवारी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या ऑल झारखंड स्टुडंट युनियनने स्वत: निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी जनता दल (संयुक्त)नेही झारखंडमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता.

आता झारखंडमध्ये काँग्रेस, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल व झारखंड मुक्ती मोर्चा यांनी युती केली असून हेमंत सोरेन हे मुख्यमंत्रीचा चेहरा असतील असे या पक्षांनी जाहीर केले आहे.

काँग्रेस ३१ जागा, राजद ७ जागा व झारखंड मुक्ती मोर्चा ४३ जागा लढवणार आहे.

झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा असून तेथे ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर  या काळात पाच टप्प्यांत मतदान होत आहे तर निकाल २३ डिसेंबरला लागणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: