गेल्या वर्षी बाबरी मशीद उध्वस्त केल्या प्रकरणात ३२ आरोपींची निर्दोष मुक्त करणारे माजी न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांना उ. प्रदेश सरकारने उपलोकायुक्
गेल्या वर्षी बाबरी मशीद उध्वस्त केल्या प्रकरणात ३२ आरोपींची निर्दोष मुक्त करणारे माजी न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांना उ. प्रदेश सरकारने उपलोकायुक्तपदी नेमले आहे. गेल्या ६ एप्रिलला राज्यपालांनी यादव यांची तिसर्या उपलोकायुक्तपदी नियुक्ती केली. सोमवारी त्यांनी राज्याचे लोकायुक्त संजय मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पदाची शपथ घेतली.
गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२० रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशीद उध्वस्त प्रकरणातील ३२ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या आरोपींमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह आदींचा समावेश होता.
२०१९मध्ये यादव हे निवृत्त होणार होते पण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने बाबरीचा निकाल लावावा म्हणून एक वर्षांची मुदत वाढ दिली होती.
भ्रष्टाचारावर अंकुश असावा म्हणून उ. प्रदेशमध्ये एक लोकायुक्त व तीन उपलोकायुक्त अशी रचना असून ४ ऑगस्ट २०१६मध्ये शंभू सिंग यादव व ६ जून २०२०मध्ये दिनेश कुमार सिंग यांची उपलोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. उपलोकायुक्त पदाचा कालावधी ८ वर्षे आहे.
मूळ बातमी
COMMENTS