नवी दिल्लीः संसदेच्या दोन्ही सभागृहात आता जुमलाजीवी, बाल बुद्धि सांसद, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, चमचा, चमचागिरी, चेला, शर्म, दुर
नवी दिल्लीः संसदेच्या दोन्ही सभागृहात आता जुमलाजीवी, बाल बुद्धि सांसद, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, चमचा, चमचागिरी, चेला, शर्म, दुर्व्यवहार, नाटक, पाखंड, अक्षम, अराजकतावादी, तानाशाही, तानाशाह, विनाश पुरुष, निकम्मा, खालिस्तानी, दोहरा चरित्र, नौटंकी, ढिंडोरा पीठना, बहरी सरकार असे हिंदी शब्द वापरण्यात बंदी घातली आहे. हे शब्द आता असंसदीय शब्दांच्या यादीत टाकण्यात आले आहेत. एखाद्या खासदाराने आपल्या भाषणात, चर्चेत, वादविवादात वर उल्लेख केलेले शब्द वापरण्याआधी विचार करावा लागेल.
गुरुवारी या वृत्तानंतर खळबळ माजली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणत्याही शब्दांवर बंदी घातलेली नाही, वगळण्यात आलेल्या शब्दांची सूची तयार करण्याचे काम सुरू केले असल्याचा खुलासा केला. लोकसभेची १९५९ सालापासून अशी प्रक्रिया सुरू झाली आहे, संसदेतल्या चर्चेत वा संवादात आरोप प्रत्यारोप होत असतात अशावेळी पीठासीन अधिकाऱ्यांना काही शब्द हटवण्याचे निर्देश दिले जातात. ही संसदीय परंपरा आहे व जेथे आवश्यकता आहे ते शब्द हटवले जातात. ही माहिती सर्व संसद सदस्यांना दिली जाते. हा अधिकार आमचा आहे. नियमातला आहे. शब्दांवर कोणतीही बंदी आणलेली नाही, संभ्रम निर्माण करू नका, अशा शब्दांत बिर्ला यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली.
पण असंसदीय शब्दांच्या यादीत वर उल्लेख केलेल्या शब्दांव्यतिरिक्त दंगा, दलाल, दादागिरी, बेचारा, विश्वासघात, संवेदनहीन, मूर्ख, पिठ्ठू व यौन उत्पीडन या शब्दांचाही समावेश केलेला आहे.
लोकसभा सचिवालयाने ‘असंसदीय शब्द २०२१’ या शीर्षकांतर्गत काही शब्द व वाक्यांचे संकलन तयार केले असून त्यात त्यांनी वर उल्लेख केलेले शब्द ‘असंसदीय अभिव्यक्ती’ या यादीत समाविष्ट केले आहेत.
येत्या १८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून कामकाजात अशा शब्दांवर कशी कारवाई होईल हे पाहिले जाईल.
‘असंसदीय अभिव्यक्ती’च्या यादीत काही शब्द व वाक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते है, सांड अशांचा समावेश आहे.
अनेक विरोधी पक्षांचे खासदार अध्यक्षीय पीठावर आरोप करतात. त्यातील आप मेरा समय खराब कर रहे है, आप हम लोगों का गला घोंट दीजिए, चेयर कोर कमजोर कर दिया है, यह चेयर अपने सदस्यों का संरक्षण नही कर पा रही है अशी वाक्ये असंसदीय ठरवण्यात आली आहेत.
त्याच बरोबर काही सदस्य पीठावर आक्षेप करताना ‘जब आप इस तरह से चिल्ला कर वेल में जाते थे, उस वक्त को याद करूं या आज जब आप इस आसन पर बैठें हैं तो इस वक्त को याद करूं’… अशा भावना व्यक्त करतात. त्यांनाही असंसदीय ठरवण्यात आले आहे.
राजस्थान, छत्तीसगड, झारखंड विधानसभेनेही प्रसिद्ध केली यादी
देशाच्या संसदेने नव्हे तर राजस्थान व छत्तीसगढ विधानसभेनेही काही शब्दांना व भावनांना असंसदीय ठरवले आहे.
छत्तीसगड विधानसभेने बॉब कट हेयर, गरियाना, अंट-शंट, उच्चके, उल्टाचोर कोतवाल को डांटे यांचा असंसदीय शब्दांच्या यादीत समावेश केला आहे,
राजस्थान विधानसभेने कांव कांव करना, तलवे चाटना, तडीपार, तुर्रम या शब्दांना तर झारखंड विधानसभेने कई घाट का पानी पीना, ठेंगा दिखाना या शब्दांचा असंसदीय शब्दांच्या यादीत समावेश केला आहे.
असंसदीय शब्दांच्या यादीतले इंग्रजी शब्द
‘कोविड स्प्रेडर’, ‘स्नूपगेट’, ‘आय विल कर्स यू’, ‘बिटेन विद शू’, ‘बिट्रेड’, ‘ब्लडशेड’, ‘ब्लडी’, ‘चीटेड’, ‘शेडिंग क्रोकोडाइल टियर्स’, ‘डंकी’, ‘गून्स’, ‘माफिया’, ‘रबिश’, ‘स्नेक चार्मर’, ‘टाउट’, ‘ट्रेटर’, ‘विच डॉक्टर’, ‘अशेम्ड’, ‘अब्यूज़्ड’, ‘चाइल्डिशनेस’, ‘करप्ट’, ‘कॉवर्ड’, ‘क्रिमिनल’ डिस्ग्रेस’, ‘ड्रामा’, ‘आईवॉश’, ‘फज’, ‘हूलीगनिज़्म’, ‘हिप्पोक्रेसी’, ‘इनकॉम्पीटेंट’, ‘मिसलीड’, ‘लाई’, ‘अनट्रू’ या शब्दांना असंसदीय शब्दांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
विरोधक आक्रमक
असंसदीय शब्दांची ही भलीमोठी यादी प्रसिद्ध झाल्याने सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारवर तुटून पडले आहेत. मोदींच्या सरकारचा खरा चेहरा उघड पाडणारे सर्व शब्द आता असंसदीय शब्दांच्या यादीत टाकले गेले आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी संसदेत आता खासदारांनी काय बोलू नये, याचे हे आदेश असल्याचा टोला सरकारला मारला आहे. मी माझ्या भाषणात, शरम आली पाहिजे, धोका दिला आहे, हे सरकार भ्रष्ट, पाखंडी, अक्षम आहे, अशा शब्दांचा वापर करणार आहे, भलेही मला त्याबद्दल निलंबित केले तरी माझा संघर्ष कायम राहील असे ब्रायन म्हणाले.
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही एका मीमची मला आठवण आली असे, सांगत ‘अगर करे तो करे क्या, बोले तो बोले क्या? सिर्फ, वाह मोदी जी वाह!’ या सोशल मीडियावरील लोकप्रिय मीमचे उदाहरण दिले.
मूळ बातमी
COMMENTS