राष्ट्रपतीपद उमेदवारीचा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारला

राष्ट्रपतीपद उमेदवारीचा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारला

नवी दिल्लीः राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. बुधवारी तृणमूल काँग

कर्नाटकः माध्यान्ह भोजनात अंडे-मांस न ठेवण्याची शिफारस
इंटरनेट बंद असल्याने मीडियाचे हाल – काश्मीर प्रेस क्लब
आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता

नवी दिल्लीः राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी २२ राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १६ पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करण्यासंदर्भातला प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी पुढे आणला पण शरद पवार यांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यांनी आपण सक्रिय राजकारणात अजून राहणार असल्याचे स्पष्ट केले.

तर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार सर्व पक्षांच्या सहमतीने होईल असे स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी फारुख अब्दुल्ला, गोपालकृष्ण गांधी यांचे नावे राष्ट्रपतीपदासाठी सूचवली आहेत.

आता हे सर्व विरोधी पक्ष एक आठवड्याच्या आत पुन्हा बैठक घेणार असून त्यामध्ये राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये उमेदवाराविषयी सहमती तयार करण्यासाठी ममता बॅनर्जी, शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर २२ राजकीय पक्षांना निमंत्रणे पाठवण्यात आली होती. यात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल व तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव उपस्थित राहिले नाहीत. बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक हेही अनुपस्थित राहिले. त्याच बरोबर अकाली दल व जगनमोहन रेड्डींचा पक्षही या बैठकीपासून दूर राहिला.

या बैठकीत शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सपाचे अखिलेश यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, काँग्रेसचे जयराम रमेश, खरगे, द्रमुकचे केटीआर बालू, शिवसेनेचे सुभाष देसाई व प्रियंका चतुर्वेदी, जेडीएसचे एचडी देवगौडा व कुमारस्वामी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, राजदचे मनोज सिन्हा हे नेते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0