कंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप

कंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप

अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यामध्ये आपला न्यायालयावर विश्वास नसल्याचे सांगत कंगना राणावत हिने थेट न्यायाधीशांवर आरोप केला. प्रसिद्ध गीतकार जावेद अ

आदरणीय पंतप्रधान, भजन करण्यापेक्षा सकस अन्नामुळे कुपोषणाची समस्या सुटेल !
राज्यातल्या ३६ लाख विद्यार्थ्यांचेही लसीकरण होणार
‘जूनचा पगार द्या’ बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांना पत्र

अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यामध्ये आपला न्यायालयावर विश्वास नसल्याचे सांगत कंगना राणावत हिने थेट न्यायाधीशांवर आरोप केला.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या फौजदारी तक्रारीशी संबधित सुनावणीस हजर न झाल्यास अटक वॉरंट बजावण्याच्या इशाऱ्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत ही सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाली. मात्र त्याचवेळी कोणत्याही कारणाशिवाय आपल्याविरोधात अटक वॉरंट बजावण्याचा इशारा देणाऱ्या न्यायालयावर आपला विश्वास नसल्याचा आरोप करून कंगनाने या प्रकरणाची सुनावणी अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी केली.

तसेच कंगनाने अख्तर यांच्याविरोधात खंडणी आणि धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कंगनावरील आरोप हा अदखलपात्र आणि जामीनपात्र आहे. असे असतानाही न्यायालयाने कोणत्याही कारणाशिवाय सुनावणीसाठी हजर न झाल्यास अटक वॉरंट बजावण्यासाठी धमकावल्याचा युक्तिवाद कंगनाच्या वकिलांतर्फे करण्यात आला.

प्रकरण अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्याच्या कंगनाच्या अर्जावरील निर्णयानंतर या प्रकरणी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. कंगनाच्या प्रकरण वर्ग करण्याच्या याचिकेवर १ ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0