कर्तारपूर मार्गिका नोव्हेंबरमध्ये सुरू होणारच –पाकिस्तान

कर्तारपूर मार्गिका नोव्हेंबरमध्ये सुरू होणारच –पाकिस्तान

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यानची बहुचर्चित कर्तारपूर मार्गिका उभय देशांमध्ये कितीही तणाव असला तरी ती ठरल्या वेळेत सुरू होणार असे पाकिस्तानचे पंतप

काश्मीरप्रश्नी ट्रम्प पुन्हा मध्यस्थीस तयार
रोख रकमेच्या अनुदानाची चलाख खेळी
परदेशातून कर्जे घेण्याची भारताची योजना धोकादायक

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यानची बहुचर्चित कर्तारपूर मार्गिका उभय देशांमध्ये कितीही तणाव असला तरी ती ठरल्या वेळेत सुरू होणार असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विशेष सहाय्यक फिर्दोस अवान यांनी स्पष्ट केले आहे. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार फिर्दोस अवान यांनी जम्मू व काश्मीरला विशेष अधिकार देणारे ३७० कलम भारताने रद्द केले असले तरी शीखांचे धर्मगुरु गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनावर परिणाम होणार नाही, असे ट्विट केले आहे.

अवान म्हणाल्या की, गुरु नानक यांचे अखेरचे दिवस कर्तारपूर येथे होते आणि हे स्थळ शीखांचे पवित्रस्थळ म्हणून अनेक दशके ओळखले जाते. हे स्थळ धार्मिक सलोख्याचे प्रतीक असून भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये कितीही तणाव असला तरी त्याची छाया या मार्गिकेवर येऊ न देण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. कर्तारपूरला भेट देण्याची इच्छा असणाऱ्या शीख समुदायाला पाकिस्तानचे दरवाजे कायम उघडे असतील. हिंसा व असहिष्णुता वाढल्याच्या या काळात कर्तारपूर मार्गिका हा धार्मिक आदर व सहिष्णुता यांना अधोरेखित करत आहे, असे त्या म्हणाल्या.

गेल्या जुलै महिन्यात कर्तारपूर मार्गिकेमधील पायाभूत सोयी वाढवण्याच्या दृष्टीने या मार्गिकेवर पूल बांधण्याची भारताची मागणी पाकिस्तानने मान्य केली होती. त्याचबरोबर ५ हजार शीख भाविकांना रोज पाकिस्तानात येण्याची परवानगी दिली होती.

येत्या नोव्हेंबर महिन्यात शीखांचे धर्मगुरु गुरु नानक देव यांची ५५० जयंती असून या निमित्ताने भारतातून हजारो शीख भाविक कर्तारपूर मार्गिकेतून पाकिस्तानात जाणार आहेत. त्या दृष्टीने भारताने या मार्गिकेतील व्यवस्थापनाची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे. यापूर्वी भारताने १९७४च्या करारानुसार दररोज १० हजार शीख भाविकांना कर्तारपूर गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी पाकिस्तानने प्रवेश द्यावा अशी विनंती केली होती. या विनंतीवर पाकिस्तानने अंशत: सहमती दर्शवली असून ५ हजार शीख भाविकांना त्यांच्याकडे भारतीय पारपत्र असेल तर व्हिसाशिवाय त्यांना पाकिस्तानात प्रवेश करण्यास मुभा दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0