कुमार स्वामींचा फैसला गुरुवारी

कुमार स्वामींचा फैसला गुरुवारी

बंगळुरू : १६ आमदारांच्या राजीनाम्यावरून कर्नाटकच्या राजकारणात निर्माण झालेल्या पेचावर अंतिम तोडगा काढण्यासाठी येत्या गुरुवारी ११ वाजता कुमारस्वामी सरक

भाजप हा संपूर्ण भारताचा पक्ष नाही
काँग्रेसमध्ये बदल : गुलाम नबी, खर्गे यांना हटवले
पक्षांतर्गत लोकशाहीच्या पायमल्लीचा इतिहास

बंगळुरू : १६ आमदारांच्या राजीनाम्यावरून कर्नाटकच्या राजकारणात निर्माण झालेल्या पेचावर अंतिम तोडगा काढण्यासाठी येत्या गुरुवारी ११ वाजता कुमारस्वामी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी अखेर दिले.

सोमवारी कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनास सुरवात झाली असता भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. सरकार जोपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्घ करत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा यांनी कुमारस्वामी सरकार अल्पमतात असल्याने या सरकारने राजीनामा द्यावा किंवा बहुमताला सामोरे जावे, अशी मागणी केली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बोलून १८ जुलैला कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. विधान परिषदेतही असाच गोंधळ झाला. तेथील कामकाज नंतर तहकूब करण्यात आले.

दरम्यान गुरुवारपर्यंत विधानसभेचे कामकाजही चालणार नसल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले आहे. गुरुवारी ११ वाजता भाजपच्या अविश्वासाच्या ठरावावर चर्चा होईल व त्यानंतर बहुमत घेतले जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0